Sat, Aug 24, 2019 23:38होमपेज › Aurangabad › ‘त्या’ टोळीकडे मिळाले 38 शिक्के

‘त्या’ टोळीकडे मिळाले 38 शिक्के

Published On: Mar 24 2018 2:13AM | Last Updated: Mar 24 2018 2:01AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

बनावट आधार कार्ड, शिधापत्रिका, मतदान ओळखपत्र बनवून ते वाट्टेल तितक्या रुपयांत विक्री करणार्‍या मोठ्या रॅकेटचा गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी पर्दाफाश केला. यात पकडलेल्या तिघांना न्यायालयाने 31 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, शेकडो कागदपत्रे जप्त करण्यात आलेल्या या टोळीकडे विविध प्रकारचे 38 शिक्के मिळून आले.  

सय्यद हमीद सय्यद हबीब (45, रा. मुजफ्फरनगर, एन-13, हडको), शेख हबीब शेख हनीफ (29, रा. कोतवालपुरा) आणि पूनमचंद दिगंबर गणोरकर (52, रा. एन-12, हडको) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सय्यद हमीद हा आधार मल्टी सर्व्हिसेस या दुकानाचा मालक असून शेख हबीब तेथील तंत्रज्ञ आहे. त्याच्याच सुपीक डोक्यातून ही कल्पना समोर आली आहे. विशेष म्हणजे, तो विशेष पोलिस अधिकारी (एसपीओ) आहे, तर गणोरकर हा ग्राहकांना शोधून आणण्याचे काम करीत होता. 

याबाबत पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी सांगितले की, या टोळीची रात्री कसून चौकशी केली असून त्यांच्याकडे 23 पिवळ्या आणि 67 केशरी शिधापत्रिका, 140 आधार कार्ड, अपंगांची 40 प्रमाणपत्रे, 29 जातीचे दाखले, काही मतदान ओळखपत्रे, शिक्के बनविण्याचे साहित्य, तसेच 50 आयकॉन स्टिकर्स आढळून आले होते. या टोळीकडे जवळपास विविध शासकीय कार्यालयांतील 38 शिक्के मिळून आले असून जिल्हाधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, आगारप्रमुख, तहसीलदार आदींच्या शिक्क्यांचा समावेश आहे.

Tags : Aurangabad, Aurangabad News, 38 stamps, got from a gang, Adhar card, voter id