Sun, Apr 21, 2019 05:48होमपेज › Aurangabad › जनसुविधेंतर्गत ३० लाखांचा  निधी

जनसुविधेंतर्गत ३० लाखांचा  निधी

Published On: Feb 18 2018 1:55AM | Last Updated: Feb 17 2018 11:15PMपरभणी : प्रतिनिधी

जिल्हा वार्षिक योजना 2017-18 अंतर्गत ग्रामपंचायतींना जनसुविधा विशेष योजनेंतर्गत विविध विकासकामांसाठी निधी देण्याकरिता जिल्हा परिषदेला तब्बल 1 कोटी 72 लाखांस मंजुरी मिळाली आहे. यात मोठया ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान म्हणून जिंतूर तालुक्यातील बोरी व आडगाव येथील ग्रामपंचायतींना अंतर्गत सिमेंट रस्त्यांसाठी प्रत्येकी 15 लाख असे 30 लाख रुपये देण्यात आले आहेत.  

या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील 44 कामांचा समावेश झाला आहे. गतवर्षी 2017 च्या अखेरीस झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या कामांना मंजुरी देऊन 1 कोटी 72 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे. 

सर्वसाधारण सभेत याची मंजुरी घेतल्यानंतर अंतिम कामाची यादी जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आली. त्यानंतर निधीस मंजुरी मिळाली आहे. यात महत्त्वाचे म्हणजे 2016-17 मधील वडाळी येथील स्मशानभूमी रस्त्यासाठी मंजूर झालेला 5 लाखांचा निधी रद्द करून केहाळ तांडा येथील स्मशानभूमीसाठी तो मंजूर करण्यात आला आहे.
तालुकानिहाय ग्रामपंचायतींना वाटप झालेला निधी

परभणी तालुका : वडगाव इक्कर-5 लाख, ताडलिंबला-3 लाख, जिंतूर  तालुका ः भोसी-5 लाख. कुर्‍हाडी-5 लाख, सुकळी-3 लाख, निवळी बु.-5 लाख, दगडचोप-4 लाख, बोरी-5 लाख, निवळी बु.-3 लाख, करवली-5 लाख, संक्राळा-3 लाख, साखरतळा-3 लाख, दुधगाव-3 लाख, गडदगव्हाण-4 लाख, सुकळी अंतर्गत वडाची वाडी-2 लाख, सेलू तालुका ः राधेधामणगाव-5 लाख, वालूर - 5 लाख, कवडधन-6 लाख, मालेटाकळी-4 लाख, रवळगाव - 3 लाख, रायपूर - 3 लाख, रवळगाव-5 लाख, पिंपरी गौंडगे-4 लाख, पाथरी तालुका ः वाघाळा - 3 लाख, हादगाव बु.-3 लाख 50 हजार, रेणाखळी - 3 लाख 50 हजार, मानवत तालुका ः इरळद-5 लाख, पूर्णा तालुका ः मुंबर - 3 लाख, देवठाणा - 3 लाख, आजदापुर - 7 लाख, गंगाखेड तालुका ः बोर्डा - 7 लाख, सुरळवाडी - 5 लाख, इसाद - 5 लाख, खादगाव - 5 लाख, सोनपेठ तालुका ः निमगाव - 3 लाख, वडगाव स्टेशन - 3 लाख 50 हजार, खडका-3 लाख 50 हजार असा एकूण 1 कोटी 72 लाखाचा निधी मंजूर झाला आहे.

पालम तालुक्याला झिरो बजेट

हा तालुका मागासलेला आहे. याच्या निर्मितीपासून विकास झाला नाही. खंबीर नेतृत्वाअभावी विकासकामांच्या निधीत नेहमीच डावलले जाते अशी ओरड आहे. जनसुविधेंतर्गतही तालुक्याला निधीची उपलब्धता करण्यात न आल्याचे जिल्हा परिषदेच्या मंजूर आराखड्यावरून दिसते. 

अशी केली जाणार कामे : जिल्ह्यात जनसुविधेंतर्गत निवडलेल्या गावांतील समस्यांनुसार कामांना निधीत टाकला आहे. यामध्ये स्मशानभूमी पोहोच रस्ता, शेड, बौध्द समाज स्मशानभूमी, मुस्लिम समाज कब्रस्तान  रस्ता, प्रतिक्षा हॉल व संरक्षण भिंत बांधकाम, स्मशानभूमी सुशोभीकरण, माळी समाज स्मशानभूमी, चौधरी स्मशानभूमी सुशोभीकरण, धनगर समाज स्मशानभूमी रस्ता अशा प्रकारची 44 कामे केली जाणार आहेत.