Fri, May 24, 2019 06:51होमपेज › Aurangabad › स्वयंरोजगार करणार्‍या २२ वर्षीय फेरीवाल्याची आत्महत्या

स्वयंरोजगार करणार्‍या २२ वर्षीय फेरीवाल्याची आत्महत्या

Published On: Jan 15 2018 7:49PM | Last Updated: Jan 15 2018 7:49PM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

मनपा, पोलिस आणि हप्ता मागणाऱ्या गुंडांच्या त्रासाला कंटाळून एका २२ वर्षीय फेरीवाल्‍याने आत्‍महत्‍या केली आहे. अजिंक्‍य विजय महालकर असे आत्‍महत्‍या केलेल्‍या फेरीवाल्‍याचे नाव आहे. अजिंक्‍य हा स्वस्तात दागिने विकण्याचा व्यवसाय करीत होता. मात्र, त्‍याची गाडी चालवण्यासाठी मनपा, पोलिस आणि हप्ता मागणारे गुंड पैसे मागत असल्‍याचा आरोप त्‍याच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

या सर्वांच्या त्रासाला कंटाळूनच आपल्‍या मुलाने आत्‍महत्‍या केली आहे. त्याच्या आत्महत्येस फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी न करणारी व्यवस्था असल्याने त्याच्या कुटुंबीयांना ५ लाख रूपये नुकसान भरपाई व त्याच्या भावाला नोकरी देण्याची मागणी शहीद भगतसिंग हकर्स युनियनने केली आहे.