होमपेज › Aurangabad › मुख्य बसस्थानकात २२, सिडकोत ८ कॅमेरे

मुख्य बसस्थानकात २२, सिडकोत ८ कॅमेरे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

प्रवाशांच्या आणि कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी राज्यातील प्रत्येक आगार  आणि बसस्थानकावर  सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन दिवसांपासून मध्यवर्ती बसस्थानक 22 सीसीटीव्ही कॅमेरे आणि सिडको बसस्थानकात 8 सीसीटीव्ही बसविण्यासाठी कॉम सॉल्ट टेक या खासगी कंपनीच्या तज्ज्ञांनी सर्र्वेेक्षण करून कॅमेरे बसविण्याची जागा निश्‍चित केली आहे, अशी माहिती विभागीय वाहतूक नियंत्रक संदीप रायलवार यांनी दिली.

बसस्थानक आणि आगार परिसरात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिवहन महामंडळाच्या वतीने ही मोहीम राबविली जात आहे. त्याचाच  एक भाग म्हणून  हे कॅमेरे बसविले जाणार आहेत. बसस्थानकातील वर्दळीचा गैरफायदा घेऊन पाकिटमारी, किरकोळ स्वरूपाच्या चोर्‍या, महिलांची छेडछाड  अशा स्वरूपाच्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी एसटी महामंडळाने आता प्रत्येक बसस्थानकावर सीसीटीव्ही  कॅमेरे बसविण्याचे नियोजन केले आहे. या नियोजनाचाच एक भाग म्हणून  दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या मुख्यालयातून कॉम सॉल्ट टेक या कंपनीचे तीन तज्ज्ञ शहरात आले होते. यांनी मध्यवर्ती बसस्थानक आणि सिडको  बसस्थानकाचा सर्व्हे केला. या  सर्व्हेच्या वेळी  विभागीय नियंत्रक, विभागीय वाहतूक नियंत्रकासह  आगार प्रमुख आणि अन्य विभागांतील उच्चपदस्थ अधिकारी  उपस्थित होते.  

मुख्य बसस्थानकासाठी 27 कॅमेर्‍यांचा प्रस्ताव

मध्यवर्ती बसस्थानकात एकूण 27  कॅमेरे  बसविण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. 24 सीसीटीव्ही कॅमेरे हे फिक्स पोझिशनमध्ये तर पीटीझेड ( एक मुूव्हेबल ) कॅमेरा, दोन डोम, कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, असे आगार क्रमांक दोनचे आगार प्रमुख स्वप्निल धनाड यांनी सांगितले.