Wed, Jun 26, 2019 23:32होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : कार ट्रकला धडकल्याने दोघे ठार; एक गंभीर

औरंगाबाद : कार ट्रकला धडकल्याने दोघे ठार; एक गंभीर

Published On: May 22 2018 9:18AM | Last Updated: May 22 2018 9:18AMऔरंगाबाद : पुढारी ऑनलाईन

औरंगाबाद जालना रोडवर झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. डिव्हायडर क्रॉसव करुन कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडक दिली. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, औरगाबाद जालना रोडवरील सटाणा पाटीजवळ काल रात्री उशिरा कार आणि ट्रकचा अपघात झाला. कार अमरावतीकडे जात असताना डिव्हायडर क्रॉस करुन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली तेव्हा विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला जोराची धडक बसली. यात कारमधील अमरावतीच्या दोघांचा मृत्यू झाला. अपघातातील जखमीला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.