Tue, Jul 23, 2019 01:55होमपेज › Aurangabad › जलशुद्धीकरण केंद्रात अडीच मेट्रिक टन पावडर 

जलशुद्धीकरण केंद्रात अडीच मेट्रिक टन पावडर 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

 औरंगाबाद : प्रतिनिधी

फारोळा जलशुद्धीकरण केंद्रावर जलशुद्धीकरण रसायनाचा स्टॉक संपत आल्याने शहराचा शुद्ध पाणीपुरवठा धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. बुधवारी रात्री उशिरा या केंद्रावर शुद्धीकरण रसायनाचा मुबलक साठा उपलब्ध झाल्याने हा धोका टळला. तसेच पाणीपुरवठा विभागानेही सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. दैनिक पुढारीने ‘शहराचा शुद्ध पाणीपुरवठा धोक्यात’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करीत हे प्रकरण उघडकीस आणले होते.

शहरवासीयांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी जायकवाडी धरणातून येणार्‍या पाण्यावर फारोळा जल शुद्धीकरण केंद्रावर रासायनिक प्रक्रिया केली जाते. त्यानंतर ते शुद्ध पाणी नागरिकांना पुरवठा केले जाते. मात्र, या केंद्रावरील जल शुद्धीकरणच्या रासायनिक पावडरचा साठा संपत आल्याने संपूर्ण शहराचा शुद्ध पाणीपुरवठा धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. बुधवारी रात्री उशिरा या केंद्रावर रासायनिक पावडरचा अडीच मेट्रिक टन स्टॉक दाखल झाला आहे.

या साठ्यामुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती टळली आहे. दरम्यान, शुक्रवारीही पंधरा टन ब्लिचिंग पावडर दाखल होणार असल्याने पुढचे अनेक महिने पुरेल एवढा मुबलक साठा या केंद्रावर उपलब्ध असणार आहे. 

 

Tags : Aurangabad, Aurangabad news, Parola water purification center, powder,


  •