होमपेज › Aurangabad › दीडशे कोटींच्या रस्त्यांना ग्रहण; निविदा नव्याने प्रसिद्ध होणार

दीडशे कोटींच्या रस्त्यांना ग्रहण; निविदा नव्याने प्रसिद्ध होणार

Published On: Dec 23 2017 7:20PM | Last Updated: Dec 23 2017 7:20PM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

दीडशे कोटींच्या रस्त्यांसाठी दाखल निविदांमध्ये केवळ दोन कंत्राटदार पात्र ठरल्याने महानगरपालिका प्रशासनाने फेर निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी या निविदा प्रसिद्ध होणार असून, निविदा भरण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली. 

राज्य शासनाने शहरातील रस्त्यांसाठी महापालिकेला शंभर कोटी रुपयांचा निधी जून महिन्यात मंजूर केला आहे. या शंभर कोटींसोबत महापालिकेने स्वतःच्या निधीतून पन्नास कोटी रुपयांचे व्हाइट टॅपींग पद्धतीचे रस्ते बनविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दीडशे कोटी रुपयांच्या कामांच्या प्रत्येकी २५-२५ कोटी रुपयांच्या सहा निविदा दोन महिन्यांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. 
कंत्राटदारांनी या कामांसाठी २१ निविदा दाखल केल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने निविदांची छाननी सुरू केली होती. पहिल्या टप्प्यात तांत्रिक बीडची तर नंतर फायनान्सील बीडची तपासणी करण्यात आली. मात्र त्यात केवळ दोनच कंत्राटदार पात्र ठरले आहेत. त्यामुळे फेर निविदा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.