Thu, Jan 24, 2019 08:00होमपेज › Aurangabad › आषाढी एकादशीनिमित्त १२ विशेष रेल्वे गाड्या

आषाढी एकादशीनिमित्त १२ विशेष रेल्वे गाड्या

Published On: Jul 13 2018 12:47AM | Last Updated: Jul 12 2018 11:28PMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

आषाढी एकादशी यात्रेनिमित्त मराठवाड्याच्या कानाकोपर्‍यातून जाणार्‍या भाविकांना यात्रेसाठी जाता यावे म्हणून दक्षिण मध्य रेल्वेने 12 विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यात नांदेड विभागातून 8 विशेष रेल्वे सोडण्यात येणार असल्याची माहिती नांदेड कार्यालयाकडून मिळाली. 

गाडी क्र. 07515 नगरसोल- पंढरपूर विशेष गाडी नगरसोल येथून दिनांक 22 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजता निघून ती रोटेगाव, परसोडा, लासूर मार्गे औरंगाबाद येथे 6.50 वाजता पोहोचून ती 7.5  वाजता सुटणार आहे. पुढे ती  जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी टाऊन, कुर्डूवाडी मार्गे ही रेल्वे पंढरपूर येथे दिनांक 23 जुलै रोजी सकाळी 10.5 वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्र.07516 पंढरपूर-नगरसोल ही विशेष गाडी पंढरपूर तेथून दिनांक 24 जुलै रोजी रात्री 11.50 वाजता सुटेल आणि दिनांक 25 जुलै रोजी सुटून नगरसोल येथे दुपारी 1.30 वाजता पोहोचणार आहे. या विशेष रेल्वेला 10 डबे जोडण्यात येणार असल्याची माहिती नांदेड विभागाने दिली आहे. 

तसेच 22 जुलै रोजी अकोला-पंढरपूर विशेष रेेल्वे अकोला येथून रात्री 8.10 वाजता सुटेल व ती वाशीम, हिंगोली, पूर्णा, मार्गे परभणी येथे दिनांक 23 जुलै रोजी रात्री 12.30 वाजता पोहोचेल. ही गाडी परभणी येथे नगरसोल-औरंगाबाद येथून येणार्‍या गाडी क्र. 07515 या गाडीला जोडण्यात येईल. पुढे ही गाडी पंढरपूर येथे सकाळी 10.5 वाजता पोहोचणार आहे. त्याचबरोबर पंढरपूरसाठी बिदर-पंढरपूर-बिदर ही विशेष गाडी दिनांक 22 जुलै रोजी दुपारी बिदर येथून 1.45 वाजता सुटेल आणि ही गाडी आदिलाबाद-पंढरपूर विशेष गाडीला लातूर रोड येथे जोडण्यात येईल.