Thu, Jun 27, 2019 03:47होमपेज › Aurangabad › एसबीआयच्या पाच महिन्यांत १२ शाखा मर्ज

एसबीआयच्या पाच महिन्यांत १२ शाखा मर्ज

Published On: Dec 18 2017 2:28AM | Last Updated: Dec 17 2017 11:54PM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

पाच मोठ्या राष्ट्रीयीकृत बँकांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण झाल्यानंतर बँकेने काही शाखांचे इतर शाखांत मर्ज करण्याचे धोरण स्वीकारले आहे. गेल्या पाच महिन्यांत औरंगाबाद शहरातील 12 शाखांना एसबीआयने इतर शाखेत मर्ज केले आहे. यात काही शाखा जास्त अंतरावर गेल्याने ग्राहकांमध्ये नाराजी पसरली असल्याचे सूत्रांकडून कळते. 

राष्ट्रीयीकृत बँकांचे विलिनीकरण होण्यापूर्वी, या बँका स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रतिस्पर्धी होत्या. यामुळे शहरातील अनेक भागात या बँकांच्या शाखा एकमेकांच्या जवळ होत्या. यात प्रामुख्याने स्टेट बँक ऑफ हैदराबादचा यात प्रामुख्याने समावेश होता. विलिनीकरणानंतर एकाच बँकेत रुपांतर झाल्यामुळे बँकेने एकाच परिसरात असलेल्या या शाखांना इतर शाखांमध्ये मर्ज करण्याचा निर्णय घेतला. यानुसार पाच महिन्यांत शहरातील 12 शाखांचे विलिनीकरण करण्यात आले आहे.

यात गुरुद्वारा रोडची शाखा उस्मानपुरा शाखेत मर्ज करण्यात आली. भाग्यनगर शाखा, महावीर चौक शाखेत. शहागंज ट्रेडर्स, शहागंज शाखेत, टीव्ही सेंटर शाखा, जाधववाडी शाखेत, स्टेशन रोडची शाखा, बन्सिलालनगर शाखेत. स्टेडियम रोडची शाखा, शिवाजीनगर शाखेत. सारंग सोसायटी शाखा, रामदास टॉवर शाखेत. वाल्मी कॅम्पसमधील शाखा, कांचनवाडी शाखेत. देवगाव रोड लासूरची शाखा, लासूर स्टेशन शाखेत. टॉऊन सेंटरची शाखा, इंडस्ट्रियल एरिया शाखेत. देवळाई शाखा, सातारा शाखेत. वाळूज एमआयडीसी शाखा, इंडस्ट्रियल एरिया वाळूज शाखेत मर्ज करण्यात आली आहे. एसबीआयतर्फे ग्राहकांना तशा सूचना अगोदरपासून दिल्या आहेत. तसेच सदर शाखांच्या गेटबाहेर बोर्डही लावण्यात आलेले आहे, मात्र या निर्णयानंतर काही शाखा या पूर्वीपासून दूर अंतरावर गेल्याने काही ग्राहक नाराजी व्यक्‍त करीत आहेत.