होमपेज › Aurangabad › दहावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट

दहावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट

Published On: Mar 02 2018 1:22AM | Last Updated: Mar 01 2018 11:04PMआष्टी : प्रतिनिधी

दहावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून, आष्टी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या दौलावडगाव परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट आहे. तर आष्टीत कॉपी पुरविणार्‍यांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला.  

गुरुवारी दौलावडगाव येथील परीक्षा केंद्रावर पालकांची गर्दी दिसून आली. तर पाणक्या म्हणून पाणी पुरविणारे मुलेच कॉप्या देताना आढळून आले. हॉलमध्ये पर्यवेक्षकांच्या डोळ्यादेखत कॉपी होत आहे, यास त्यांचीही मूकसंमती असल्यामुळे बिनधास्तपणे कॉपी होत आहे. प्रशासनाने नियुक्त केलेले बैठे पथकही कुचकामी ठरत आहे. परीक्षा केंद्रावर बंदोबस्तासाठी असलेले पोलिस कर्मचारी गर्दी रोखण्यासाठी अपयशी ठरत आहेत. गुरुवारी मराठी या भाषा विषयाला देखील कॉपीचा सुळसुळाट होत असल्याने हुशार विद्यार्थी मात्र यामध्ये मागे पडत असून त्यांचे नुकसान होत आहे.