Sun, Dec 15, 2019 05:17होमपेज › Arthabhan › लक्ष्मीची पावले : सध्या रिलायन्स उद्योगात गुंतवणूक नको!

लक्ष्मीची पावले : सध्या रिलायन्स उद्योगात गुंतवणूक नको!

Published On: Jun 24 2019 1:22AM | Last Updated: Jun 24 2019 1:22AM
डॉ. वसंत पटवर्धन
 

सध्या बेरोजगारीबद्दल बरीच चर्चा व टीका सुरू आहे. त्यावर मात करण्यासाठी औद्योगिक कंपन्या आणि इन्फ्रास्ट्रक्‍चरमध्ये एप्रिल ते सप्टेंबर या 2019-20 च्या वर्षात 58000 रोजगार निर्माण करण्याचे सरकारने ठरवले आहे. 

गेल्या शुक्रवारी बाजार उघडताना निर्देशांक व निफ्टी अनुक्रमे 39360 व 11768 वर होते. सदाहरित बजाज फायनान्स हा वाढून 3577 वर होता. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कंपनीने जून तिमाहीचे आकडे प्रसिद्ध केले; की तो पुन्हा 300 रुपयांनी वाढेल. 

महिंद्र आणि महिंद्र फिनान्शियल सध्या 396 रुपयाला उपलब्ध आहे. त्याचा गेल्या बारा महिन्यातील कमाल भाव 526 रुपये होता; तर किमान भाव 342 रुपये होता. रोज सुमारे 4 ते 8 लक्ष शेअर्सचा व्यवहार होतो. 

वेदांत हा अनिल अगरवाल समूहातला शेअर सध्या 172 रुपयाला उपलब्ध आहे. गेल्या बारा महिन्यातील कमाल भाव 246 रुपये तर किमान भाव 146 रुपये होता. सध्याच्या भावाला किं/उ. गुणोत्तर 9.12 पट दिसते. 

पिरामल एन्टरप्राइझेज सध्या 1900 रुपयाच्या आसपास आहे. या भावाला तो घेण्यासारखा आहे. नॉन बँकिंग फिनान्शियल क्षेत्रात ती एक उत्तम कंपनी आहे. खरेदी 1850 रुपयाच्या आसपास असावी. कंपनीचा बारा महिन्यातील कमाल 8307 रुपये होता, तर किमान भाव 1726 रुपये होता. सध्याच्या भावाला किं/उ. गुणोत्तर 26 पट दिसते.  रोज सुमारे 8 ते 10 लक्ष शेअर्सचा व्यवहार होतो. पिरामल एन्टरप्राइझेसची पिरामल हेल्थकेअर ही उपकंपनी, जे बी केमिकल्स या कंपनीचे शेअर्स विकत घेऊन आग्रहण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे हा शेअर भविष्यकाळात चांगल्यारितीने वाढेल. जे. बी. केमिकल्स घेण्यासाठी लुपिनही प्रयत्नशील आहे. 

ब्रिगेड एन्टरप्राइझेस या गृहनिर्माण क्षेत्रातल्या कंपनीचा शेअर सध्या 250 रुपयाला उपलब्ध आहे. गेल्या बारा महिन्यातील शेअरचा कमाल भाव 268 रुपये तर किमान भाव 156 रुपये होता. सध्याच्या भावाला किं/उ. गुणोत्तर 14.2 पट दिसते. माफक प्रमाणावर इथे गुंतवणूक करायला हरकत नाही. 

सुब्रास ही वाहनांचे सुटे भाग निर्माण करणारी एक कंपनी आहे. फक्‍त मारुती सुझुकीवरच अवलंबून न राहता अन्य पॅसेंजर गाड्यांच्या कंपन्यांमध्येही विक्री करण्याचा तिचा प्रयत्न आहे. सुब्रास ही कंपनी वाहनातील एअर कंडिशनिंग सिस्टीम्स आणि रेडिमेटर्सचे उत्पादन करते. टाटा मोटर्स, महिंद्र अँड महिंद्र आणि रेनॉ-निस्सान या कंपन्याही तिच्या ग्राहकवर्गात आहेत. पण केवळ पॅसेंजर गाड्यांवर अवलंबून न राहता बसेस आणि ट्रक्स या क्षेत्रातही ती शिरकाव करीत आहे. मारुतीखेरीज अन्य कंपन्याही आपल्या ग्राहकवर्गात असाव्यात यासाठी ती जास्त प्रयत्नशील आहे, असे कंपनीचे अर्थ विभागाचे प्रमुख हेमंत आगरवाल यांनी  म्हटले आहे.

2018-19  वर्षात कंपनीची विक्री 2134 कोटी रुपयांची झाली. या आधीच्या वर्षात ती 1920 कोटी रुपये होती.  पुढील काही वर्षात आपला व्यवहार 10 ते 12 टक्क्याने वाढेल असा कंपनीचा अंदाज आहे. कॉर्पोरेट अ‍ॅव्हरेज फ्युएल एफिशिअन्सीबद्दलचे आपले निकष सरकार 2022 सालापर्यंत बदलणार आहे. गाड्यातील एअरकंडिशनिंगची यंत्रे जास्त अद्ययावत त्यामुळे जास्त किंमतीची बसवली जाणार आहेत. 
रिझर्व्ह बँकेने एच डी एफ सी बँकेलाKnow your Costomer (KYC) चे  नियम न पाळल्याबद्दल 1 कोटी रुपयाचा दंड केला आहे. 

सरकारी कर्जरोख्यांमध्ये 12500 कोटी रुपयांची खरेदी करून रिझर्व्ह बँक द्रवता वाढवणार आहे. त्याचा शेअर बाजाराला फायदा होईल. NCC हा शेअर काही विश्‍लेषकांच्या मते घेण्यासारखा आहे. सध्या हा शेअर 100 रुपयाला उपलब्ध आहे. 95 रुपयाला तो मिळाला तर घ्यावा; आणि 105 ते 110 रुपयाला तो काढून टाकावा. 27 तारखेच्या गुरुवारी वायदेबाजाराच्या जूनच्या व्यवहारांची जेव्हा पूर्तता होईल. त्यानंतर 2, 3 दिवसात हा भाव येण्याची शक्यता आहे. 

प्रादेशिक ग्रामीण बँकांत (RRB) केंद्र सरकार नजीकच्या भविष्यात काही भांडवलाचा पुरवठा करेल. ओडिशाचे राज्य सरकार नीलाचल इस्पात या तोट्यात असलेल्या कंपनीतील भांडवल काढून टाकायचा विचार करत आहे. पण ते घ्यायला कोणी वाली असणार नाही हे उघड आहे. 

इंडिया रेटिंग्ज कंपनीने पंजाब नॅशनल बँकेच्या 6750 कोटी रुपयाच्या कर्जरोख्यांना 'Dawngrade' केले आहे. बांगला देशने त्यांच्या 100 स्पेशल इकॉनॉमिक झोन्स (SEZ) मध्ये भारतीय भांडवलदारांनी गुंतवणूक करावी असे आवाहन केले आहे. 

सध्या बेरोजगारीबद्दल बरीच चर्चा व टीका सुरू आहे. त्यावर मात करण्यासाठी औद्योगिक कंपन्या आणि इन्फ्रास्ट्रक्‍चरमध्ये एप्रिल ते सप्टेंबर या 2019-020  च्या वर्षात 58000 रोजगार निर्माण करण्याचे सरकारने ठरवले आहे. 

CLSA या  पतमूल्यन कंपनीने भारत फोर्जचा सध्याचा भाव कमी होऊन 390 रुपयांपर्यंत येण्याची शक्यता  वर्तवून ते विकण्याची शिफारस केली आहे.रिलायन्स इंडस्ट्रीज, JIO मध्ये  20000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे रिलायन्स उद्योतील शेअर्समध्ये सध्या गुंतवणूक नसावी.