अर्थवार्ता 

Last Updated: Dec 29 2019 8:22PM
Responsive image

प्रीतम मांडके


गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकाने अनुक्रमे 26.00 आणि 106.40 अंकांची घट दर्शवून 12245.8 आणि 41575.14 अंकांच्या विक्रमी पातळीच्या जवळपास बंदभाव दिला. निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकात अनुक्रमे 0.21 टक्के तसेच 0.26 टक्क्यांची घट दर्शवली गेली.

1 जानेवारीपासून स्टेट बँक आपल्या ग्राहकांना ‘एटीएम’साठी ओटीपी आधारित सेवा पुरवणार. सकाळी आठ ते संध्याकाळी आठ या वेळेत ग्राहक एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यास कार्ड स्वाईप केल्यावर ग्राहकाच्या खात्याशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. एटीएम कार्डचा चार अंकी पीन नंबर आणि आलेला ओटीपी एटीएम मशीनमध्ये एंटर केल्यावर मगच ग्राहकाला व्यवहार करता येणार. ग्राहकाच्या सुरक्षेच्या द़ृष्टीने पाऊल उचलल्याचे एसबीआय बँकेचे स्पष्टीकरण.

पीएमसी बँक प्रकरणी मुंबई पोलिसांच्या अर्थगुन्हे अन्वेषण शाखेने 32 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले. संशयित थकीत 43 खात्यांमध्ये एकूण 5027.33 कोटींची देणी बाकी होती. परंतु एचडीआयएलची केवळ 21 खाती थकीत असून 333.14 कोटींची रक्कम देणे बाकी असल्याचे रिझर्व्ह बँकेला करण्यात आले होते. याप्रकरणी ‘एचडीआयएल’चे त्यावेळेचे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवान यांच्याविरुद्ध तसेच पीएमसी बँकेचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर जॉय थॉमस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई पोलिसांच्या अर्थगुन्हे अन्वेषण शाखेने याप्रकरणी 4335.46 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे नमूद केले.

स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांना सेबीच्या नव्या नियमानुसार, चेअरमन आणि मॅनेजिंग  डिरेक्टर या पदांचा कार्यभार स्वतंत्र व्यक्तींकडे देणे बंधनकारक केले जाणार. एकच व्यक्ती या दोन्ही पदांचा कार्यभार सांभाळणार नाही. यासाठी सर्व कंपन्यांना 31 मार्च 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या नियमान्वये हिंदुस्थान युनिलिव्हर या बलाढ्य कंपनीच्या नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमनपदी नितीन परांजपे यांची वर्णी लागण्याची शक्यता असून मॅनेजिंग डिरेक्टरपद संजीव मेहता यांच्याकडे कायम राहण्याची शक्यता.

रुपया चलनाने 4 पैसे कमकुवत होत डॉलरच्या तुलनेत प्रतिडॉलर 71.35 रुपयांच्या पातळीवर बंदभाव दिला. साप्ताहिक आकडेवारीनुसार रुपया 19 पैशांनी कमकुवत झाला. कच्च्या तेलानेदेखील तीन महिन्यांच्या उच्चांकी भावाला स्पर्श केला. ब्रेंट क्रुड 0.22 टक्क्यांनी वधारला. 68.07 डॉलर प्रतिबॅरल तसेच डब्ल्यूटीआय क्रूड 0.4 टक्क्यांनी वधारून 61.92 डॉलर प्रतिबॅरलच्या पातळीवर पोहोचले. 10 वर्षांच्या सरकारी रोख्यांचा परतावा (गर्व्हमेंट बाँड यील्ड) 6.51 टक्क्यांवर आला.

लोढा उद्योगसमूह मुंबईमधील आपल्या दोन मालमत्ता विकून 1500 कोटी रुपये उभे करण्याच्या तयारीत. सध्या या समूहावर 16 हजार कोटींचे कर्ज, एप्रिल अथवा मे 2020 पर्यंत 6 हजार कोटींनी कर्ज कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे या कंपनीच्या प्रमुखांचे स्पष्टीकरण.

झायडस कॅडीला ही औषधनिर्मिती करणारी कंपनी आपल्या दोन उपशाखा 1200 कोटींना विकून टाकणार. हेन्झ इंडिया ही कंपनी 4600 कोटींना खरेदी केल्यानंतर तयार झालेले कर्ज कमी करण्यासाठी कॅडीला कंपनी हा निधी वापरणार. कॅडीला कंपनीतील हिस्सा खरेदीसाठी केकेआर, ब्लॅकस्टोन, कार्लार्व्हल यासारखे खासगी गुंतवणूकदार तसेच सनफार्मा, सिप्ला, अ‍ॅडव्हेंट यासारखे कॅडीलाचे प्रतिस्पर्धीदेखील उत्सुक.

2019 सालच्या पहिल्या 11 महिन्यात ‘एसआयपी’च्या मार्गाने म्युच्युअल फंडामध्ये आलेल्या गुंतवणूक निधीत 12 टक्क्यांची वाढ. मागील वर्षी या कालावधीदरम्यान एसआयपीद्वारे 80,645 कोटींची गुंतवणूक म्युच्युअल फंडात करण्यात आली. यावर्षी ही गुंतवणूक वधारून 90,094 कोटींवर पोहोचली. एकूण म्युच्युअल फंडांमध्ये 9 लाख 50 हजार खाती उघडण्यात आली.

मारुती उद्योग लिमिटेड समूहाचे माजी व्यवस्थापकीय संचालक जगदीश खट्टर यांच्या विरोधात 110 कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला. खट्टर यांची नवीन ‘कारनेशन ऑटो’ कंपनीने पीएनबी बँकेकडून कर्ज घेतले होते. परंतु, सहेतुक त्यांनी हे कर्ज बुडवून निधी इतरत्र वळवल्याचा आरोप पीएनबी बँकेने केला आहे.

भारतीय कंपन्यांनी या वर्षात तब्बल 30 अब्ज डॉलर्सचा निधी परदेशातून उभा केला. कंपन्यांनी रु. 88 अब्ज डॉलर चलन स्वरूपातील रोखे विकले, तर 8.36 अब्ज डॉलर्सची कर्जे उभी केली.

भारताची परकीय गंगाजळी 20 डिसेंबर रोजी संपलेल्या सप्ताहाअखेर 456 दशलक्ष डॉलर्सनी वधारली. 454.948 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवर पोहोचली. 

(मांडके फिनकॉर्प)

हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणा-यास अटक


रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हाची निवृत्ती


पुणे : बँक घोटाळा; आमदार अनिल भोसले पोलिस कोठडीत (Video)


रतन लाल यांना मिळणार 'शहिद दर्जा', राज्य सरकारकडून १ कोटींची मदत


'चंद्रपूर'च्या दारूबंदी विरोधात ९३ टक्के निवेदने 


कोल्हापूर : म्हाकवे फाट्यावरील अपघातात केनवडेचा तरूण ठार 


राज्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी विषय सक्तीचा


परभणी : इटाळी खून प्रकरणाचे गूढ वाढले


कोरोना : राज्यातील सर्व ९१ प्रवाशांची चाचणी निगेटिव्ह, आरोग्यमंत्र्यांची माहिती


सातारा : बीट मार्शल योजनेचा दुसरा टप्पा कार्यान्वित