Thu, Nov 14, 2019 06:46होमपेज › Arthabhan › चकाकता हिरा : MAS फिनान्शिअल सर्व्हिसेस

चकाकता हिरा : MAS फिनान्शिअल सर्व्हिसेस

Published On: Jun 24 2019 1:22AM | Last Updated: Jun 24 2019 1:22AM
यावेळचा चकाकता हिरा म्हणून MAS  फिनान्शिअल सर्व्हिसेस या कंपनीची निवड केली आहे. गेल्या शुक्रवारी सकाळी या शेअरचा भाव 605 रुपये होता. गेल्या  बारा  महिन्यातील कमाल भाव 631 रुपये तर किमान भाव 365 रुपये होता. सध्याच्या भावाला किं/उ. गुणोत्तर 21.5 पट दिसते. मात्र या शेअरमध्ये व्यवहार कमी होतात. गेल्या ऑक्टोबरमध्ये या शेअरचा भाव सर्वात कमी होता. तिथून तो आता वाढत चालला आहे. सध्याच्या भावात 20 ते 25 टक्के वाढ होऊन तो 730 ते 745  पर्यंत जावा. कंपनीने आपल्या स्वतःच्या गृहवित्त विभागातील पोट कंपनीत 56 टक्के गुंतवणूक  केली आहे. कंपनी आपल्या व्यवसायासाठी मुदत कर्जे घेते. पण ही कर्जे आटोक्यात असतात. कंपनीच्या व्यवस्थापनाखालील जिंदगी ही सर्व बाजूंनी सुरक्षित आहे. कंपनी आपला व्यवसाय यापुढे मध्यप्रदेश व राजस्थानमध्ये वाढवण्याचा विचार करत आहे. सध्या तिचा बराचसा व्यवहार महाराष्ट्र व गुजरातमध्ये होतो. कंपनीचे व्यावसायिक वर्ष संपते. जेम्स  कंपनी स्वतःकडील रोकड व बँकातील शिल्‍लक यात जास्त रक्‍कम ठेवते. त्यामुळे ताळेबंद भक्‍कम वाटतो. 

कंपनीचे स्वतःचे मुख्य कार्यालय जिथे आहे तिथे ती आणखी बांधकाम करत आहे. आपल्या  प्रवर्तकांना कंपनीने 14.40 कोटी रुपये मेहनताना (पगार) म्हणून दिले आहेत. अन्य कर्मचार्‍यांच्या पगारातही 15 टक्के वाढ केली आहे. गेल्या बारा महिन्यात कंपनीने आपल्या गृह वित्त व्यवसायात 90 कोटी रुपयांची वाढ केली आहे. कंपनीच्या ताळेबंदात अजूनही 5.70 कोटी रुपयांची रक्‍कम गुड विल म्हणून दाखविण्यात आली आहे. 

MAS फिनान्शिअलमध्ये प्रवर्तकांची गुंतवणूक 73 टक्के आहे. पुढील तीन वर्षात कंपनीच्या करोत्तर नफ्यात 20 ते 22 टक्के चक्रवाढ दराने  वाढ व्हावी. या कंपनीप्रमाणेच HDFC बँक, HDFC बँक,  बजाज फिनान्स, इक्‍विटास आणि LIC हौसिंगमध्येही गुंतवणूक सुरक्षित व्हावी.