अतुल इंडिया

Published On: Sep 09 2019 1:42AM | Last Updated: Sep 09 2019 1:42AM
Responsive image


यावेळचा चकाकता हिरा म्हणून ‘अतुलइंडिया’ ची निवड केली आहे. सध्या या शेअरचा भाव 3451 आहे. वर्षभरात तो 4420 व्हावा, अशी अपेक्षा आहे. बाजारात या कंपनीच्या उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणात आहे. सुमारे 90 देशात तिची 1350 च्यावर उत्पादने खपतात. पुढील दोन वर्षात कंपनीचा व्यवसाय 13.5 टक्क्याने वाढेल आणि शेअरगणिक उपार्जन 182 रुपये आणि 222 रुपये असू शकेल. या शेअरमध्ये सध्या गुंतवणूक किफायतशीर ठरेल. स्पेशॅलिटी केमिकल्समध्येही तिचे उत्पादन आहे.

या कंपनीचे उद्घाटन देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. कंपनीकडे सध्या 3000 च्या वर कर्मचारी आहेत. 90 देशात ते कामे करीत आहेत. कंपनी  घाऊक व किरकोळ क्षेत्रात विक्री  करते. 431 कुशल (prafessionals) कर्मचारी तिच्याकडे आहेत आणि ते अमेरिका व इंग्लडमध्ये काम करतात. कंपनी इंटरमिजिएट द्रव्यांची तसेच सुगंधांची निर्मिती करते. वस्त्रोद्यागातील रंग, पिमेंट्स, पेपर डाईज, शाई आणि वस्त्रोद्योगातील रसायनांचीही निर्मिती करते.

जगात शेती, मासेमारी आणि अरण्ये यातील उत्पादने यांचे मूल्य 3.2 ट्रिलीयन डॉलर्स इतके आहे. दरवर्षी त्यात 3 टक्क्यांची वाढ होत आहे. त्यातही शेतीचे उत्पादन जास्त मोठ्या प्रमाणात आहे. तिची उत्पादने टायरक्षेत्रातही खपतात. परदेशात तिची उत्पादने खपत असल्यामुळे परदेशी चलनांच्या किंमती रुपयाच्या संदर्भात कमी जास्त होत असल्यामुळे त्याचा फायदा अगर तोटा कंपनीला होऊ शकतो. रंगक्षेत्रात तिचे नवीन प्रकल्प 250 कोटी रुपये गुंतवून नफा क्षेत्र बळकावेल.

बाबी कोटी रु.  मार्च 2018 मार्च 2019 मार्च 2020 मार्च 2021
विक्री  3147 3916 4443 4837
ठोबळ नफा  472.47 736.19 882.77 1030.30
करोतर नफा  270.41 428.51 542.07 631.13

शेअरगणिक उ. (पट) किं/उ.

91.16 144.51 182.64 212.78
गुणोत्तर 38.17 24.08 19.05 16.35