अर्थवार्ता

Published On: Sep 09 2019 1:42AM | Last Updated: Sep 09 2019 1:42AM
Responsive image

प्रीतम मांडके
 


गतसप्‍ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकाने अनुक्रमे 77.05 व 351.02 अंकांची घसरण दर्शवून 10946.2 व 26981.77 अंकांच्या पातळीवर बंदभाव दिला. निफ्टी व सेन्सेक्समध्ये अनुक्रमे 0.7 टक्के आणि 0.94 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली.
  
सप्टेंबर महिन्यात गैरबँकिंग वित्तपुरवठा क्षेत्रातील सुमारे 35 हजार कोटींचे व्याज गुंतवणूकदारांना परतावा स्वरूपात दिले जाणार. आयएस अँड एफएसच्या रोख्यांचा परतावा बुडीने गैरबँकिंग वित्तपुरवठा क्षेत्रासाठी कसोटीचा काळ. दिवाण हाऊसिंग फायनान्स या गृहवित्तपुरवठा क्षेत्रातील कंपनीच्या 4147 कोटी रुपये किमतीच्या रोख्यांचा कालावधी सप्टेंबर महिन्यात पूर्ण होणार आहे. इडेलवाईज, आनंद राठी, आयआयएफएल या कंपन्यांचेदेखील प्रत्येकी 600 कोटी ते 800 कोटींची रक्‍कम गुंतवणूकदारांना परतावा स्वरूपात या महिन्यात दिली जाणार.
  
देशातील बँकांचे व्याजदर खाली आणण्यासाठी आरबीआयची कठोर पावले. 1 ऑक्टोबरपासून रिझर्व्ह बँकेने देशातील बँकांना आपले कर्जव्याजदर रेपो रेटशी संलग्‍न करण्याचे आदेश दिले. वर्षभरात रेपो रेट 1.10 टक्के कमी करूनदेखील बँकांनी 0.40 टक्क्यांचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवला. या आदेशामुळे ग्राहकांना स्वस्त दरात कर्जे उपलब्ध होणार.
  
आदिती बिर्ला कॅपिटलमध्ये अ‍ॅडव्हेंट इंटरनॅशनल 1 हजार कोटी गुंतवणूक करणार. त्याचप्रमाणे बिर्ला समूहाची ग्रासीम इंडस्ट्री 770 कोटी आणि प्रेमजी इन्व्हेस्ट 100 कोटींची गुंतवणूक करणार. व्यवसाय विस्ताराच्या द‍ृष्टीने आदित्य बिर्ला कॅपिटल सुमारे 2100 कोटींचा निधी इक्‍विटी तसेच रोख्यांच्या माध्यमातून उभा करणार.
  
इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स विरोधात दिल्‍ली उच्च न्यायालयात जनहित याचिका. ताळेबंदात तसेच आर्थिक बाबींमध्ये अनियमितता असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप. याचिकेपश्‍चात इंडियाबुल्स हाऊसिंगचा समभाग साडेचार टक्के कोसळला. 1 एप्रिलनंतर इंडिया बुल्स हाऊसिंगचा समभाग सुमारे 50 टक्के कोसळला. तसेच कंपनीचे बाजारभांडवल (मार्केट कॅप) 21 हजार कोटींनी कमी झाले.
  
परदेशी चलनसंबंधी नियमांचा भंग केल्याच्या संशयावरून आर्थिक बाबींशी निगडित चौकशी करणार्‍या ‘इन्फोर्समेंट डिक्टोरेट’ या तपास संस्थेने जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांची 7 तास चौकशी केली.
  
आर्थिक दिवाळखोरी जाहीर केलेल्या भूषण पॉवर अँड स्टीलच्या खरेदीसाठीची जेएसडब्ल्यू स्टीलची 19700 कोटींची निविदा राष्ट्रीय कंपनी न्यायाधिकरणाने (एनसीएसटी) स्वीकारली. भूषण पॉवर अँड स्टीलवर सध्या 47158 कोटींचे कर्ज.
  
कार्लाइल तसेच जनरल अ‍ॅटलांटिक सिंगापूर कंपनी पीएनबी हाऊसिंग फायनान्समधील आपला हिस्सा 2 हजार कोटींनी वाढवणार. सध्या कार्लाइल पीएनबी हाऊसिंगमध्ये 32.25 टक्के तसेच जनरल अ‍ॅटलांटिकचा पीएनबी हाऊसिंगमध्ये 9.87 टक्के हिस्सा आहे.
  
ऑगस्ट महिन्यात ‘युपीआय’ ऑनलाईन व्यवहार 900 दशलक्ष पर्यंत पोहोचले. युपीआयद्वारे झालेल्या  व्यवहारांचे मूल्य 1.54 लाख कोटींवर पोहोचले. डिजिटल आर्थिक व्यवहार संख्या जुलै महिन्याच्या तुलनेत तब्बल 11.6 टक्के, तर व्यवहारमूल्य 5.5 टक्के वधारले. कॅनडाचे गुंतवणूकदार प्रेमवत्सा आपल्या फेअरफॅक्स कंपनीमार्फत पुढील पाच वर्षांत भारतात 5 अब्ज डॉलर्स (सुमारे 35 हजार कोटींची) गुंतवणूक करणार.
  
थकीत कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या आयडीबीआय बँकेला सरकारचा मदतीचा हात. सरकार आयडीबीआयला 9300 कोटींचा निधी पुरवणार. यापैकी 51 टक्के म्हणजेच 4743 कोटी रुपये एलआयसी देणार, तर 49 टक्के 4557 कोटी केंद्र सरकार देणार.
  
गतसप्‍ताहात शुक्रवारअखेर रुपया चलनाने डॉलरच्या तुलनेत 12 पैशांच्या मजबुतीसह 71.72 रुपये प्रतिडॉलरच्या पातळीवर बंदभाव दिला. 30 ऑगस्ट रोजी संपलेल्या सप्‍ताहात भारताची परकीय गंगाजळी 446 दशलक्ष डॉलर्सनी घटून 428.604 अब्ज डॉलर्स झाली.
  
चीन आणि अमेरिकेमधील व्यापारयुद्ध निवळण्याची चिन्हे. व्यापारासंबंधी मध्यमार्ग शोधून काढण्यासाठी पुढील महिन्यात दोन्ही देशातील राजनैतिक अधिकार्‍यांमध्ये बैठक होणार.
समन्वयक : श्रीराम ग. पचिंद्रेनंदुरबार झेडपीच्या सभापती पदावरून काँग्रेस-शिवसेनेत रस्सीखेच 


नागरिकत्व कायद्याला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; केंद्राला बजावली नोटीस


नम्रताने ४ वर्षांनी लहान महेश बाबूशी बांधली होती लगीनगाठ


पनवेल पालिका कर्मचारी मंत्रालयाला देणार धडक (video)


नाशिक : ३४ टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना दिलासा 


मनसे नेत्याची मुख्यमंत्र्यांवर विखारी टीका; 'उद्धवा अजब तुझे सरकार'


सीबीआयकडून अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह सहकाऱ्यांवर ४ नवीन खटले दाखल


पुणे : धानोरीमध्ये किरकोळ वादातून युवकाची हत्‍या 


'गंगूबाई काठियावाडी'च्‍या दबंगगिरीचे आव्‍हान चुलबुल्‍या आलियास पेलणार का?


मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पाथरीकर मुंबईत दाखल