Mon, Aug 19, 2019 11:12होमपेज › Arthabhan › खात्रीशीरपणा जात चालला!

खात्रीशीरपणा जात चालला!

Published On: Sep 10 2018 1:19AM | Last Updated: Sep 10 2018 1:19AMडॉ. वसंत पटवर्धन, पुणे

गेल्या आठवड्यात बाजार तसा ‘नर्व्हस मूड’मध्येच होता. निर्देशांक 38389 वर आणि निफ्टी 11583 वर बंद झाला. हेग 4111 रुपयांपर्यंत खाली आला. ग्राफाईट इंडिया 993 रुपये इथेच थांबला. ओएनजीसी 172 रुपये होता. पेट्रोलचे जागतिक आणि इथेही भाव वाढत असताना ओएनजीसी वाढायला हवा. मन्नापूरम् फायनान्स 96 रुपयांपर्यंत उतरला आहे. श्री. राणा कपूर यांची नियुक्ती रिझर्व्ह बँकेने मान्य केली आहे. पण येथे बँक 325 रुपयांपर्यंत आला आहे. इंडियन ऑईल कंपनी 154 रुपयांवर थांबला आहे. रेपको होम्स 543 वर आहे. लार्सेन टुब्रो 1352 रुपये आहे. वेग्रॅन 230 रुपये आहे. भारत पेट्रोलियम 358 रुपयांवर स्थिर आहे. 

शेअर बाजार हा राजकीय हालचाली व अनपेक्षितता यावरही बराच फिरतो. गेल्या आठवड्यात तेलंगणा विधानसभा, मुख्यमंत्री श्री. चंद्रशेखर राव यांनी राजीनामा दिल्यानंतर बरखास्त झाली. आता तिथे निवडणुका घेतल्या जातील. त्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड व मिझोराम यांच्या विधानसभा निवडणुकांबरोबर होणार की नंतर हा एक कळीचा मुद्दा निर्वाचन आयोगासाठी आहे. अशा गोष्टीमुळे राजकीय अस्थिरता जर वाढली तर शेअर बाजार जरा डळमळीतच राहतो. 

याचवेळी भारत व अमेरिका यांच्यात 3+2 स्तरावर, एकमेकांना सहकार्य करण्याबाबत वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. श्रीमती सुषमा स्वराज व श्रीमती निर्मला सीतारामन भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत. न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपमध्ये (छडॠ) भारताला प्रवेश देण्यासाठी त्यात भर देण्यात येईल. तसेच पाकिस्तानमधून लष्कर-ए तोयबाद्वारे ज्या घातपाती कारवाया केल्या जात आहेत त्याबाबतही विचार विनिमय होईल. अमेरिका पाकिस्तानला याबाबत ठणकावून सांगेल व कदाचित पाकिस्तानमध्येच असलेल्या दाऊद इब्राहिमला भारताच्या स्वाधीन केले जाईल. तसे झाले तर सध्याच्या सरकारचे ते एक मोठे यश समजले जाईल व याही बाबीचा शेअर बाजारात स्थैर्य यायला उपयोग होईल. शेअर बाजाराचे लक्ष आता 15 सप्टेंबरला कॉर्पोरेटकरांचे आगाऊ हप्ते कोण, किती भरेल यावर असेल. त्यावरून सप्टेंबर तिमाहीचे त्याचे हप्ते कसे असतील त्याचा अंदाज येईल. 

पावसाळा आता निम्मा होऊन गेला आहे. पण खरीप पिकांचा अंदाज त्यामुळे कृषितज्ज्ञ यापुढे घेतील व ग्रामीण क्षेत्राशी संबंधित कंपन्या यापुढे जास्त नफा दाखवतील. भारत सध्या इराणकडून पेट्रोल घेत आहे व इराणवर अमेरिका प्रतिबंध (ीरपलींळेपी) लावू बघत आहे. पण इराण-भारत संबंधात अमेरिका हस्तक्षेप करणार नसल्याचा तिने शब्द दिला आहे. त्यामुळे आपली पेट्रोलची मागणी पुरी व्हायला अडचण येणार नाही. त्यातच ओएनजीसीला ईशान्य भारतात नवीन पेट्रोलचे साठे मिळाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या कंपनीचे शेअर्स भागभांडवलात जरूर हवेत. 

तसेच पावसाळा ओसरू लागल्यामुळे इमारती, पूल, महागाई, अन्य बांधकामे क्षेत्रात असलेल्या दिलीप बिल्डकॉन, अशोका बिल्डकॉन, आय. डी. डी. सिमेंटेशन, सद्भाव इंजिनिअरिंग, आयआरबी इन्फ्रा, जे. कुमार इन्फ्रा, जीएमसी प्रोजेक्टस, के. एन. आर. कन्स्ट्रक्शन्स, जीएनजी इन्फ्राटेक व पुढे चकाकता हिरा म्हणून परामर्श घेतलेला, एच. जी. इन्फ्रा या कंपन्यातील गुंतवणूक उत्तम ठरेल. सोमा, ओबेरॉय, रिअ‍ॅल्टी, पिरामळ एंटरप्रायझेस याही कंपन्या गुंतवणूक करण्यासारख्या आहेत. 

अशोका बिल्डकॉन सध्या 140 रुपयांच्या आसपास आहे. तो 220 रुपयांपर्यंत वाढू शकतो. मार्च 2019 व 2020 वर्षासाठी तिचे शेअरगणिक उपार्जन अनुक्रमे 9.3 रुपये व 9.8 रुपये असू शकेल. सध्याच्या भावाला किं./उ. गुणोत्तर 15.8 पट आहे.

दिलीप बिल्डकॉन हा महागडा शेअर आहे. सध्या त्याची किंमत 800 रुपये आहे. वर्षभरातील त्याचा कमाल व किमान भाव अनुक्रमे 1247 रुपये होता. वर्षभरात तो पुन्हा पूर्वीचा उच्चांक गाठेल. सध्याच्या भावाला किं./उ. गुणोत्तर 19 पट आहे. 

येस बँक हा अनपेक्षितपणे 325 रुपयांपर्यंत उतरला आहे. खासगी क्षेत्रातील या तरुण बँकेचा नक्त नफा दर तिमाहीला वाढलेलाच दिसतो. गेल्या बारा महिन्यांतील येस बँकेचा कमाल भाव 404 रुपये व किमान भाव 285 रुपये होता. सध्याच्या भावाला किं/उ. गुणोत्तर 18 पट दिसते. सध्या 325 रुपयाला खरेदी केला तर वर्षभरात 25 टक्के नफा मिळू शकेल. 

मात्र दिवसेंदिवस शेअर बाजारातला खात्रीशीरपणा (लशीींरळपीूं) जात चालला आहे. कंपनीच्या कारभारावरून काही अंदाज करावेत, तर जागतिक घटनांमुळे ते कोळपून जातात. त्यामुळे आता ‘पी हळद, हो गोरी’चे दिवस संपले आहेत. श्रद्धा आणि सबुरीवरच भिस्त ठेवायला हवी. किमान 6 ते 8 महिने ती गुंतवणूक मोकळी करता येणार नाही, ही जाणीव ठेवूनच बाजारात उतरायला हवे. नाही तर, ‘हाती नाही बळ। दारी नाही आड। त्याने फूलझाड। लावू नये॥’ ही तुकारामांची उक्ती सतत डोळ्यांसमोर हवी.