बँकेतला पैसा पोस्टातून काढा

Last Updated: Mar 22 2020 8:06PM
Responsive image


सतीश जाधव

भारतीय टपाल सेवेशी निगडित बँक इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) हे आपल्या ग्राहकांना अत्याधुनिक मोबाईल बँकिंग सुविधा देण्यासाठी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसला (युपीआय) जोडण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर टपाल खात्याचे ग्राहक हे कोणत्याही बँक खात्याचा पैसा हा कोणत्याही टपाल कार्यालयातून काढून घेऊ शकतात. 

युपीआयला जोडण्याची तयारी 

युपीआय हे एक त्वरित व्यवहार करण्याची प्रणाली आहे. ही प्रणाली नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केली आहे. युपीआय हे ग्राहकांना दोन खात्यातील व्यवहार तातडीने पूर्ण करण्याची सुविधा देते. आयपीपीबीच्या एका अधिकार्‍यानुसार आगामी एप्रिल महिन्यापासून इंडिया पोस्ट पेमेंट बँक, युनिफाइड युपीआयशी जोडली जाईल. त्यानंतर आयपीपीबी हा ग्राहकांना आपल्या खात्यातून अन्य ग्राहकाच्या खात्यावर पैसा जमा करू शकतो. याशिवाय अन्य सुविधादेखील मिळणार आहेत. 

क्यूआर कोडने व्यवहाराची सुविधा  आयपीपीबीमध्ये युपीआय लागू केल्याने या बँकेचे ग्राहक आयआरसीटीसीच्या पोर्टलवर रेल्वे आरक्षण करू शकतात. त्याचबरोबर अन्य दुकानांवर क्यूआर कोड स्कॅन करून सेवा किंवा व्यवहाराचे पैसे देऊ शकतात. याशिवाय आयपीपी हे फास्टटॅग रिचार्जच्या सुविधेवरही काम करत आहे. कदाचित पुढील महिन्यापासून बँकेचे ग्राहक हे आपल्या खात्यातून फास्ट टॅगचे रिचार्ज करू शकतील. यासाठी आयपीपीबीच्या अ‍ॅप्लिकेशनवरची फास्ट टॅग रिचार्जची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम सुरू आहे. 

‘आधार’ मदतीने व्यवहारावर जोर 

बँकेशिवाय अ‍ॅपच्या माध्यमातून व्यवहाराची सुविधा प्रदान करणार्‍या कंपन्या या आधारच्या मदतीने व्यवहार करण्यावर भर देत आहेत. यात आयपीपीबी देखील मागे राहू इच्छित नाही. त्यांचा जोर हा इनेबल्ड पेमेंट सिस्टिम (एइपीएस) वरून जागरूकता वाढवण्यावर असणार आहे. यामुळे ग्राहक खात्यातील पैसा हा कोणत्याही टपाल कार्यालयातून काढू शकणार आहेत. यासाठी त्याचे खाते आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. एइपीएसअंतर्गत ग्राहक कोणत्याही बँकेतून आपला पैसा आयपीपीच्या खात्यात जमा करू शकतात. एइपीएसचा लाभ घेण्यासाठी त्याच्या क्षेत्रात टपाल कार्यालय असणे गरजेचे आहे. 

बचत खात्यावर जादा व्याज

 पोस्ट खाते हे अन्य बँकेच्या तुलनेत बचत खात्यावर जादा व्याज देत आहे. टपाल खाते सध्या पाच वर्षांच्या मुदतठेवीवर 7.7 टक्के व्याज देत आहे. तसेच देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय ही पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर 6 टक्के व्याज देत आहे. टपाल खात्याच्या पाच वर्षांच्या रिकरिंग खात्यावर 7.2 टक्के व्याज आहे. हे व्याज बँकेपेक्षा 1.2 टक्के अधिक आहे. पोस्टाच्या एनएससीवर 7.9 टक्के, तर किसान विकास पत्रवर 7.6 टक्के व्याज दिले जात आहे. 

शिराळा : ८१ वर्षाच्या वृद्धाला कोरोना; मणदूर गावात शुकशुकाट


'तो' कोरोना रुग्ण गेला कुणीकडे? केईएम प्रशासनाचा निष्काळजीपणा सुरुच!


'कोरोना अदृष्य पण, त्याचा सामना अपराजित कोरोना वॉरियर्सशी'


तुम्ही एकटे नाही! अमेरिकेतील आंदोलनाला गुगलचा खंबीर पाठिंबा


नागपूरातील कोरोना कंट्रोलचा मुंडे पॅटर्न; अर्ली ट्रेसिंग, मास क्वारंटाईन, टीम मॅनेजमेंट


तब्बल ८ पावसाळी नक्षत्रांची सुरुवात रविवारीच! 


संगीतकार वाजिद यांच्याबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?


सातारजवळ एकाचा डोक्यात दगड घालून खून


पाससाठी तब्बल २३ वेळा अर्ज करणारा बहाद्दर सापडला जाळ्यात!


पुण्यात बाधितांची वाटचाल आठ हजारांकडे