Wed, Jul 24, 2019 06:07होमपेज › Arthabhan › व्यक्‍तिगत कर्ज करपात्र नाही

व्यक्‍तिगत कर्ज करपात्र नाही

Published On: Jun 24 2019 1:22AM | Last Updated: Jun 24 2019 1:22AM
नवी दिल्‍ली : व्यक्‍तिगत कारणासाठी घेतलेल्या कर्जावर सर्वसाधारणत: आयकर लावला जात नाही. मात्र हे कर्ज बँका किंवा अधिकृत वित्तीय संस्था या कायदेशीरद‍ृष्ट्या वैध संस्थांकडूनच घ्यायला हवे, असे अर्थविषयक सल्‍लागारांनी स्पष्ट केले आहे. घर विकत घेण्यासाठी किंवा त्यांच्या बांधकामासाठी तसेच व्यवसायासाठी व्यक्‍तिगत कर्ज घेतले असले तर त्यावर अंशत: करकपातीचा लाभही मिळू शकतो. व्यक्‍तीची कर्जपात्रता ठरवून हे कर्ज उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी ‘सिबिल’ ने तयार केलेल्या त्या व्यक्‍तीचा कजार्र्चा स्कोअर किती आहे, हे पाहिले जाते. तसेच यापूर्वीच्या कर्जफेडीची पार्श्‍वभूमीही तपासली जाते. जास्तीत जास्त 25 लाखांपर्यंतची रक्‍कम व्यक्‍तिगत कर्जापोटी मिळू शकते.