Wed, Jan 22, 2020 02:04होमपेज › Arthabhan › व्यापारयुद्धाचा फायदा भारताला

व्यापारयुद्धाचा फायदा भारताला

Published On: Sep 09 2019 1:42AM | Last Updated: Sep 16 2019 1:39AM
 डॉ. वसंत पटवर्धन

चीनबरोबर अमेरिकेचे व्यापारयुद्ध पुन्हा भडकले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून आयात होणार्‍या वस्तूंवर 125 अब्ज डॉलर्सचा कर लावला आहे. चीननेही लगेच अमेरिकेच्या आयातीवर कर लावला आहे. त्या दोघातील व्यापारयुद्धाचा फायदा भारताला होईल.

गेल्या आडवड्यात महाराष्ट्रात सर्वत्र पावसाने आपली जोरदार हजेरी लावली होती. मुंबईत तर एका दिवशी 16 ते 18 सेंटीमीटर पाऊस पडून सर्वत्र पाणी पाणी झाले. रेल्वेच्या रुळांवर गुडघ्याइतके पाणी साचल्याने लोकल्स बंद झाल्या व बर्‍याच उशिराने सुटल्या. मुंबई-पुणे रेल्वे गाड्या बंद राहिल्या व हजारो प्रवाशांचे अक्षरश: तहानभुकेने हाल झाले. कोल्हापूर-सांगली भाागानेही या पावसाचा तडाखा अनुभवला होता. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातही पुरेसा पाऊस झाला. कोल्हापूरला तर उसाऐवजी भात हवा, असे थट्टेने म्हटले गेले. झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी राज्य सरकारच्या खांद्यावर पडली. पंतप्रधान आवास योजनेत मोठ्या प्रमाणावर घरे बांधण्यासाठी वाढीव FSI Floor Space Index देण्याची शिफारसही केली गेली आहे. आपत्तीही कधी कधी चांगल्या कामांना चालना देते, त्याचे हे उदाहरण आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका अनंत चतुर्दशीनंतर जाहीर होतील. त्यानंतर लगेच आचारसंहिता लागू होईल. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली असून भाजपकडे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या रांगा लागलेल्या असल्या तरी भाजपने दार सताड उघडे टाकले नाही व योग्य त्या व्यक्‍तींनाच आत घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला निवडणुकीत प्रत्येकी 25 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असे मानले जात आहे.

शेअर बाजार गेल्या आठवड्यात गणेश चतुर्थीला बंद होता. उरलेल्या चार दिवसानंतरही बाजार संथ होता. गुरुवारी 5 सप्टेंबरचा निर्देशांक व निप्टी अनुक्रमे 36644 व 10847 वर होते. बाजारात उत्साह नाही. शेअर्सचे भाव घसरतच आहेत. बजाज  फायन्साससारखा एखादा अपवाद त्यात आहे, तर येस बँकेची घसरगुंडी चालूच आहे. येस बँक सध्या 62 रुपयाला उपलब्ध आहे. तो जर 52 रुपयापर्यंत आला तर जरूर घ्यावा. सध्या जागतिक शेअरबाजारात मंदी असल्यामुळे त्याचा परिणाम भारतीय शेअरबाजारात होत असला तरी अनेक शेअर्सचे भाव टिकून होते. 

लार्सेन टूब्रोला नुकतीच मोठी ऑर्डर मिळाली आहे. एनटीपीसीकडून ही ऑर्डर मिळाली आहे. कंपनीने नुकतेच काही परिवर्तनीय कर्ज रोखेधारकांना 11900 समभाग दिले आहेत. लार्सेन टूब्रो सध्या 1300 रुपयाला उपलब्ध आहे. नजीकच्या भविष्यात त्यात 10 टक्के वाढ होईल. बजाज फायनान्स गेल्या गुरुवारी 3291  रुपयांवर गेला होता. गेल्या वर्षातील त्याचा उच्चांकी भाव 3761 रुपये होता. मार्च 2020 पर्यंत तो 4000 रुपये व्हावा.

मॅक्स फिनान्शिअल सर्व्हिसेस सध्या 412 ते 415 रुपयाला उपलब्ध आहे. वर्षभरात तो 25 टक्के वाढून 520 रुपये व्हावा. सध्याच्या भावाला किं/ऊ. गुणोत्तर 38. 8 पट आहे. रोज सुमारे 8॥ लक्ष शेअर्सपेक्षा जास्त व्यवहार होतो. दिलीप बिल्डकॉन गेल्या आठवड्यात थोडा वाढून 373 रुपयांपर्यंत पोचला. या भावाला किं/ऊ. गुणोत्तर 12.1 पट दिसते. वर्षभरात हा शेअर 40 टक्के वाढावा. रोज सुमारे 5 लक्ष शेअर्सचा व्यवहार होतो. ए.पी.एल. अपोलो ट्यूब्जचा भाव गेल्या गुरुवारी 1270 रुपयांच्या आसपास होता. गेल्या वर्षभरातील त्याचा उच्चांकी भाव 1687 रुपये होता. मार्च 2020 पर्यंत तो पुन्हा त्या पातळीला जावा. सध्याच्या भावाला किं/ऊ. गुणोत्तर 20 पट दिसते. अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यानी सहा बँकांचे विलीनीकरण जाहीर केले असले तरी अदलाबदलीचे मूल्य जाहीर झालेले नाही. राष्ट्रीयीकृत बँकांत केंद्र सरकार जरी काही भांडवल घालणार असले तरी स्टेट  बँकेने आपल्याला त्याची आवश्यकता नाही, असे जाहीर केले आहे. स्टेट बँकेचे कार्यकारी संचालक श्री. अंशुला कांत यांनी वैयक्‍तिक कारणावरून राजीनामा दिला आहे. सरकारने तो स्वीकारला आहे. कांत यांची नेमणूक जागतिक बँकेवर होणार आहे, असे वृत्त आहे.

स्टेट बँकेने आपली गृहकर्जे 8.05 टक्क्यांवरून आणखी स्वस्त केली आहेत. जेफ्रीज या अमेरिकन पतमूल्यन संस्थेने सध्या स्टेट बँकेचा शेअर विकत घ्यावा, अशी शिफारस केली आहे. त्यात 35 टक्के वाढ होऊन 370 रुपये  व्हावा. सध्याचा भाव 270 रुपयांच्या आसपास आहे. स्टेट बँकेने आपला क्रेडिट कार्डचा व्यवसाय 11 लक्ष डॉलर्सपर्यंत नेण्याचा संकल्प केला आहे. 8 कोटी रुपयांची कार्ड ती काढेल. चीनबरोबर अमेरिकेचे व्यापारयुद्ध पुन्हा भडकले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यानी चीनमधून आयात होणार्‍या वस्तूंवर 125 अब्ज डॉलर्सचा कर लावला आहे. चीननेही लगेच अमेेरिकेच्या आयातीवर कर लावला आहे. चीनने ही लगेच अमेरिकेच्या आयातीवर कर वाढवला आहे. त्या दोघातील व्यापारयुद्धाचा फायदा भारताला होईल. दोन्ही देशातील व्यापार समित्यांमधील चर्चा अजूनही संपलेल्या नाहीत. ऑक्टोबर 15 पासून आता कंपन्यांच्या विक्रीचे व करोत्तर नफ्याचे आकडे प्रसिद्ध होऊ लागतील. पाकिस्तानच्या विमान कंपन्यांनी भारतीय हवाई मार्ग बंद झाल्याने 1000 वैमानिकांना काढून टाकले आहे. सध्या पाकिस्तानला 8 अब्ज रुपयांचा तोटा होत आहे. रिझर्व्ह बँकेने नुकताच आपला अतिरिक्‍त गंगाजळीचा साठा सरकारकडे वर्ग केल्यामुळे यावेळी अर्थसंकल्पात दाखवलेली वित्तीय तूट कमी होईल. पूर्वीचे अर्थमंत्री पी. चिंदबरम यांच्यासाठी न्यायालयीन कोठडी जाहीर झाल्यामुळे त्यांना तिहारच्या तुरुंगात जावे लागणार आहे.