सुधारित रिटर्न दाखल करताय?

Last Updated: Nov 04 2019 1:06AM
Responsive image


प्रियांका जाधव

प्राप्‍तिकर विवरणपत्र दाखल करताना एखादी चूक झाल्यास प्राप्तिकर खात्याकडून आपल्याला मेल येतो. त्यानंतर सुधारित रिटर्न दाखल करणे बंधनकारक असते. यासाठी दिलेली शेवटची तारीखदेखील ध्यानात घ्यावी लागते. प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) दाखल करताना अनेक चुका होऊ शकतात. त्या नकळतपणे होत असतात. जेव्हा प्राप्तिकर खात्याकडून या संदर्भातील मेल प्राप्त होतो तेव्हा आपल्याला नव्याने सुधारित रिटर्न दाखल करावे लागते. इथे आपल्याला आयटीआर-1 सुधारित कसे सादर करता येईल हे सांगता येईल.

शेवटची तारीख महत्त्वपूर्ण : कोणत्याही आर्थिक वर्षासाठी आयटीआर भरण्याची जी शेवटची तारीख असते, तीच सुधारित रिटर्न भरण्याची असते. उदा. 2019-20 या आर्थिक वर्षासाठीचे सुधारित रिटर्न 31 मार्च 2020 पर्यंत भरू शकता. 

चूक समजून घ्या : प्राप्तिकर खात्याकडून आलेल्या मेलचे काळजीपूर्वक वाचन करावे. चूक लक्षात कळण्यासाठी फॉर्म-16 आणि गुंतवणूक तसेच बचतीची सर्व कागदपत्रे जवळ बाळगणे गरजेचे आहे. यासाठी पुढीलप्रमाणे प्रक्रिया पार पाडावी.

प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर जा. तेथे उजव्या बाजूला रजिस्टर्ड युजरचा उल्लेख असेल. त्याखाली लॉग इन हिअरवर क्लिक करा. त्यानंतर युजर आयडी (पॅन क्रमांक), पासवर्ड आणि कॅपचा टाकून लॉगिन करा. आता वरच्या बाजूला निळ्या रंगाच्या पट्टीत असलेल्या ाू रलर्लेीपीं ला क्लिक करा. तेथे आपल्याला दुसरा पर्याय व्ह्यू ई-फाईल्स रिटर्न/फॉर्मवर क्लिक करा. आता सिलेक्ट अ‍ॅन ऑप्शनमध्ये इन्कम टॅक्स रिटर्न्सचा पर्याय निवडा. त्याखाली असलेल्या सबमिटवर क्लिक करा.

तेथे आपल्याला मागील काही वर्षाचे रिटर्न दिसतील. त्यात यावर्षीच्या फॉर्मची निवड करावी लागेल. त्याचा अकनॉलेजमेंट नंबरदेखील असतो. त्याचा उल्लेख मेलवर असेल. त्या अकनॉलेजमेंट नंबरवर क्लिक करा.

आता पान सुरू होईल. तेथे आयटीआर भरलेल्याची तारीख असेल. या तारखेची नोंद करून ठेवा. त्याचबरोबर तेथे डाऊनलोडस/स्टेटस डिस्क्रिप्शन लिहलेले असेल. त्याखाली असलेल्या आयटीआर/फॉर्मवर क्लिक करा.

आता तेथे आपण भरलेला आयटीआरचा फॉर्म दिसेल. त्याची प्रिंट आऊट काढा. मेलमध्ये उल्लेख केलेल्या चुका फॉर्ममधून जाणून घ्या. फॉर्म-16 चे अवलोकन करताना गुंतवणूक/बचत तसेच अन्य ठिकाणची चूक शोधा. ती लक्षात आल्यावर त्याची नोंद ठेवा. जर आयटीआरमधील चूक सहजासहजी येत नसेल तर सीए किंवा करतज्ज्ञांची मदत घेणे श्रेयस्कर.

सुधारित आयटीआर कसा भरावा?

जर आपल्याला चूक लक्षात आली असेल तर आणि सुधारित आयटीआर तत्काळ भरायचे असेल तर, प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर वर उल्लेखलेल्या निळ्या रांगच्या पट्टीतील ई-फाईलवर क्लिक करा. तेथे आपल्याला पहिला पर्याय इन्कमटॅक्स रिटर्नवर क्लिक करा. (जर आपल्याला सुधारित रिटर्न कालांतराने भरायचा असेल तर आपल्याला पुन्हा लॉग इन करावे लागेल.)

आता आर्थिक वर्षाची निवड करा. चालू वर्षाचा विचार करत असाल तर 2019-20 वर क्लिक करा. त्यानंतर आयटीआर फॉर्म नंबरमध्ये आयटीआर-1 ची निवड करा. त्याखाली असलेल्या फिलिंग टाईपमध्ये ओरिजनल/रिवाईजड् रिटर्नवर क्लिक करा. तेथे खाली लिहिलेल्या सबमिशन मोडमध्ये प्रिपेअर अँड सबमिट ऑनलाईनवर क्लिक करा. 

तेथे खाली आपल्या बँक खात्याचा उल्लेख असेल. जर तेथे एकापेक्षा अधिक बँक खाते असतील तर त्याचा उल्लेख असेल. त्यातील सतत वापरात असलेल्या बँक खात्याची निवड करा. त्यानंतर तेथे असलेल्या कंटीन्युवर क्लिक करा. 

आता आपल्यासमोर आयटीआर-1 फॉर्म दिसेल. त्याच्या पार्ट ए जनरल इन्फॉरमेशनच्या टॅबमध्ये आपल्याला महत्त्वाची माहिती दिलेली असेल. त्याखाली फाईल यू/एसचा पर्याय दिसेल. त्याखाली असलेल्या बॉक्सवर क्लिक करा. तेथे चार पर्याय असतील. आपण सुधारित रिटर्न भरत असल्याने आपल्याला 139(5) रिव्हाइज्ड रिटर्नवर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तेथे खाली रिसिप्ट नंबर लिहावा लागेल. हा नंबर आपण चुकीच्या रितीने भरलेल्या आयटीआर फॉर्मचा अकनॉलेजमेंट नंबर असतो. या नंबरच्या बाजूलाच अगोदरच्या रिटर्नची तारीख असेल. डेट ऑफ फिलिंग ऑफ ओरिजनल रिटर्न (तारीख/महिना/वर्ष)वर क्लिक करताच कॅलेंडर दिसेल. तेथे आपल्याला पहिल्या आयटीआरची तारीख द्यावी लागेल. या तारखेची आपल्याकडे नोंद असेलच. उर्वरित प्रक्रिया अगोदर भरलेल्या रिटर्नप्रमाणेच पार पाडावी लागेल. 

व्हेरिफाय करण्यास विसरू नका : सुधारित रिटर्न भरल्यानंतर व्हेरिफाय करणे बंधनकारक आहे. जर सुधारित रिटर्न व्हेरिफाय होत नसेल तर प्राप्तिकर विभाग ते मान्य करणार नाही. व्हेरिफिकेशनसाठी आधार ओटीपी हा चांगला पर्याय आहे. व्हेरिफिकेशनसाठी आधार ओटीपीवर क्लिक करा. त्यानंतर आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी नंबर येईल. ते भरल्यानंतर आयटीआर भरल्याचा संदेश आपल्या मोबाईलवर पाठविला जाईल. 

व्हेरिफायसाठी 120 दिवस : आयटीआर भरल्यानंतर आपण ते तत्काळ व्हेरिफाय करून घेणे फायद्याचे ठरेल. व्हेरिफाय करण्यासाठी आयटीआर फाईल केल्यानंतर 120 दिवसांचा कालावधी मिळतो. यादरम्यान व्हेरिफाय झाले नाही तर सुधारित रिटर्न फाइल न केल्याचे गृहीत धरले जाईल. अशा स्थितीत आपल्याला दंडही भरावा लागेल.  

पुढे काय : सुधारित रिटर्न भरल्यानंतर प्राप्तिकर विभागाकडून त्याची चाचपणी केली जाईल. जर चूक दुरुस्त झाली असेल तर ते रिटर्न मान्य केले जाईल. तसेच चूक कायम राहिल्यास आयटी विभाग आपल्याला नोटीस बजावेल आणि पुन्हा आपल्याला सुधारित आयटीआर दाखल करावे लागेल. 
कितीदा फाईल करू शकतो : सुधारित रिटर्न दाखल करण्यास कोणतीही मर्यादा नाही. चुका सुधारण्याची आपल्याला अनेकदा संधी मिळू शकते आणि त्यानुसार सुधारित रिटर्न फाईल करता येते.