दिलीप बिल्डकॉन

Published On: Aug 19 2019 1:29AM | Last Updated: Aug 19 2019 1:29AM
Responsive image


यावेळचा चकाकता हिरा म्हणून दिलीप बिल्डकॉनची निवड केली आहे. महामार्ग आणि पूल बांधणार्‍या कंपन्यांमध्ये ती अग्रेसर आहे. जलसंधारण क्षेत्रातही तिची कामे आहेत. जून 2019 तिमाहीची तिची विक्री गेल्या जूनपेक्षा 6 टक्क्यांनी कमी होती. घसारा आणि व्याजामुळे तसेच 22 टक्क्यांच्या करपातळीमुळे  तिचा नफा कमी झाला होता; पण महामार्ग क्षेत्रात तिच्याकडे 6000 कोटी रुपयांची कामे आहेत. 

तिची ढोबळ नफ्याची टक्केवारी 18 टक्के आहे. 2019-2020 च्या पहिल्या तिमाहीत तिचा नफा 125 कोटी रुपये होता. त्याच वर्षाची विक्री 11798 कोटी रुपये होती. 
मार्च 2017 ते 2021 पर्यंत तिचे प्रत्यक्ष व संभाव्य आकडे पुढे दिले आहेत. 

कंपनीचे भाग भांडवल 13 कोटी रुपये आहे. गंगाजळी 3068 कोटी रुपये आहे. दोन वर्षांत गंगाजळी 4317 कोटी रुपये व्हावी. किं/उ गुणात्तर सध्या 8.5 पट आहे. ते दोन वर्षांत 7.8 व्हावे.

वाचकांच्या इच्छेनुसार दर आठवड्याला एका कंपनीचा परामर्ष चकाकता हिरा या सदरात घेतला जातो. त्यामुळे वर्षभरात 48 ते 52 कंपन्यांचे उल्लेख होता. 
इतक्या सर्व कंपन्यांमध्ये गुंतवणूक शक्य नसते. त्यामुळे खरेदीपेक्षा 20 टक्क्यांनी किंमत वाढली, तरी विक्री तात्पुरता नफा पदरात पाडणे इष्ट असते.