Thu, Jul 18, 2019 22:10होमपेज › Arthabhan › चकाकता हिरा

चकाकता हिरा

Published On: Sep 10 2018 1:19AM | Last Updated: Sep 09 2018 8:38PMएच. जी. इन्फ्रा

यावेळचा चकाकता हिरा म्हणून ‘एच. जी. इन्फा’ या कंपनीची निवड करता येईल. पायाभूत (इन्फ्रास्ट्रक्चर) क्षेत्रातील ही कंपनी महामार्ग, रस्ते, पूल, उड्डाणपूल आणि जल क्षेत्राशी संबंधित काम करते. लार्सन अँड टुब्रो, आयआरबी इन्फ्रा आणि टाटा समूह या कंपन्यांची ती सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करते. तिच्याजवळ 1100 कोटी रुपयांच्यावर कामे आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासाठी ती कामे करते. सध्या या शेअरचा भाव 246 रुपये आहे. गेल्या बारा महिन्यांतील किमान भाव 223 रुपये होता तर कमाल भाव 355 रुपये होता. रोज सुमारे 1 लक्ष ते सव्वा लक्ष शेअर्सची उलाढाल होते. सध्याच्या भावाला किं./उ. गुणोत्तर 15.25 पट दिसते. सध्या हा शेअर खरेदी केल्यास एक वर्षात निवेशकांना 370 रुपये भाव पहायला मिळेल. म्हणजे वर्षभरात 50 टक्के नफा दिसावा. एक स्मॉल कॅप कंपनी म्हणून हिच्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कंपनीने आपली प्राथमिक भाग विक्री मार्च 2018 मध्ये केली होती. सध्या तिची गुलाबपुरा, चितोडगड हा सहा पदरी मार्ग करण्याची कामे चालू आहेत. महाराष्ट्रातही ती नागपूर, काटोल, वारूड हा महामार्ग सुधारण्याचे काम करत आहे. नंदूरबारजवळ प्रकाशा, शहादा, खेटीया या रस्त्यावर ती काम करत आहे. पीवाय विदर्भामध्ये अमरावती, नांदगाव, मोरथी, वारूड, पांटुर्णा या रस्त्याचा विस्तार करीत आहे. अरुणाचलमध्येही तिची कामे चालू आहेत. उत्तर प्रदेशमध्ये बाबतपूर ते वाराणसी हा रस्ता सुधारण्याचे काम तिला दिले गेले आहे. पुढील वर्षात ही कंपनी 80 लक्ष ते 110 लक्ष रुपयांइतकी भांडवली गुंतवणूक करेल. 

कंपनीची तुलना अशोक बिल्डकॉन, आयटीडी सिमेंटेशन, केएनआर कन्स्ट्रक्शन्स, सद्भाव इंजिनिअरिंग, दिलीप बिल्डकॉन यांच्याशी करता येईल. कंपनीचे भागभांडवल 65.2 कोटी रुपये आहे. गंगाजळी सध्या 476 कोटी रुपयांची आहे ती 2020 साली 754 कोटी रुपये व्हावी. कंपनीचा नफा मार्च 2016 वर्षासाठी 50 कोटी रुपये होता. मार्च 2018 मध्ये तो 84.3 कोटी रुपये झाला. पुढील दोन वर्षांसाठी संभाव्य करोत्तर नफा 195 कोटी रुपये व 175 कोटी अपेक्षित आहे.