अजब-गजब : अवैज्ञानिक दंतकथा

Last Updated: Nov 08 2019 8:47PM
Responsive image


विज्ञान माणसाला प्रगत बनवते पण काही अवैज्ञानिक दंतकथा विज्ञानाला बदनामही करतात. अवैज्ञानिक दंतकथांची अनेक उदाहरणे आहेत. खाण्याची वस्तू जमिनीवर पडल्यास पाच सेकंदात उचलली तर खराब होत नाही, ही अशीच एक दंतकथा.  प्रत्यक्षात जमिनीवर पडलेली खाण्याची वस्तू काही मिली सेकंदात जीवाणूग्रस्त होऊ शकते. 

शार्क या माशाला कधीच कर्करोग होत नाही हीसुद्धा असीच एक दंतकथा. शार्कबाबत आणखी एक गैरसमजूत अशी की शार्कला शेकडो मैल दूरवरून पाण्यातील रक्‍ताचा वास येऊ शकतो. भरपूर प्रमाणात गाजरे खाल्याने द‍ृष्टी सुधारते, हा गैरसमज दुसर्‍या महायुद्धादरम्यान पसरला. याचा अर्थ असा नाही की गाजरे खाऊ नयेत. गाजरांमध्ये असलेले‘अ’ जीवनसत्त्व शरीराला उपयुक्‍त आहे. 

माणसाचा मेंदू जेवढा मोठा तेवढा तो अधिक बुद्धिमान, ही दंतकथा कशी निर्माण झाली ते सांगता येत नाही. मेंदूच्या आकाराचा व बुद्धिमत्तेचा काही संबंध नाही, असे शास्त्रज्ञ म्हणतात.