Wed, Aug 21, 2019 17:13होमपेज › Ankur › अजब-गजब : मानवी कवट्यांचा साजशृंगार

अजब-गजब : मानवी कवट्यांचा साजशृंगार

Published On: Aug 03 2019 1:14AM | Last Updated: Aug 03 2019 1:14AM
मृत मानवांच्या अस्थी किंवा शरीराचा कोणताही उरलेला भाग हा प्रत्येक संस्कृतीत पवित्र मानला जातो. माया संस्कृतीत मात्र शत्रूच्या मानवी कवटीचा काही भाग चक्‍क विजयाचे प्रतीक म्हणून शरीरावर साजशृंगारासारखा धारण केला जायचा. बेलिझ देशातील जंगलातून पुराणवस्तू शास्त्रज्ञांनी मानवी कवट्यांपासून बनवलेले दोन अलंकार शोधले आहेत. पहिला अलंकार खालच्या जबड्यापासून तर दुसरा गालाच्या अस्थीपासून बनला आहे. अस्थीवर बारीक कलाकुसर करून बनवलेले हे दोन्ही अलंकार शरीरावर धारण करता येतील अशा आकारात आहेत. माया संस्कृतीतील प्रतिष्ठित योद्धे किंवा राजघराण्यातील लोक अशा प्रकारचा मानवी कवट्यांचा साजशृंगार करत असावेत,असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.