कथा : सर्वात मोठा पापी

Last Updated: Oct 05 2019 12:16AM
Responsive image


एकदा जंगलात साथीचा मोठा रोग पसरला. अनेक प्राणी व पक्षी या रोगामुळे मरण पावले. जे वाचले ते एवढे अशक्त होते की शिकार करू शकत नव्हते. राजा सिंहाने जंगलातील सर्व प्राण्यांची सभा बोलवली.
“प्रजाजनहो!” सभेत सिंह म्हणाला, “असं वाटतं की देवाने आपल्या पापांची शिक्षा म्हणून हा रोग जंगलात पसरवला आहे.”
“होय, अगदी खरं आहे.” लांडगा क्षीण आवाजात म्हणाला.
“आपल्यापैकी सर्वात मोठा पापी असेल त्याला जर बळी दिले तर जंगलाचा देव खूश होईल. आपल्यापैकी सर्वात मोठा पापी कोण हे ठरवण्यासाठी आपण सर्व आपल्या पापांचे पाढे वाचूया.” राजा सिंहाने सुचवले.
“हे ठरवणे सोपे आहे.” कोल्हा पुटपुटला, “जंगलातील सर्वात जास्त प्राण्यांना ज्याने खाल्ले आहे तोच मोठा पापी असे मला वाटते.”
सिंह कोल्ह्याकडे वळून म्हणाला, “होय, मी सर्वात जास्त जंगलातील प्राण्यांना खाल्ले आहे. शेजारच्या गावातील पाळीव मेंढ्या-बकर्‍यांवरही ताव मारला आहे. एक-दोन गावकर्‍यांनाही खाल्ले आहे. तुम्हाला जर असं वाटतं की मी सर्वात मोठा पापी आहे, तर खुशाल मला बळी द्या.”
कोल्हा म्हणाला, “महाराज! हरण, मेंढ्या व बकर्‍या खाणे गुन्हा नाही. तुम्ही त्यांना खाल्लंत ते बरंच केलं.” लांडगा, अस्वल व रानकुत्र्यांनी यावर टाळ्या वाजवल्या. सर्वच प्राण्यांनी त्यांनी शिकार केलेल्या प्राण्यांबद्दल सांगितले. राजा सिंहाने सर्वांनाच माफ केले. त्याच्या मते शिकार झालेले प्राणी मरण्याच्याच योग्यतेचे होते. शेवटी एक रानगाढव उरले. त्याने आपल्या पापाबद्दल सांगितले.
“एकदा मी एका मंदिराच्या मालकीच्या शेताजवळून जात होतो. फारच लुसलुशीत हिरवेगार गवत होते. ते खाल्ल्याशिवाय मला रहावले नाही आणि मला माहीत आहे हा गुन्हा आहे; पण....” 
रानगाढव आपले वाक्य संपवते ना संपवते तोच सर्व प्राण्यांनी एक गदारोळ केला. त्यांना सर्वात मोठा पापी प्राणी मिळाला होता. राजा सिंह व सर्व प्राण्यांनी मिळून रानगाढवाचा बळी देण्यास जराही विलंब लावला नाही.

धुळ्याच्या सुषमा राजपूत यांचे ग्रीसच्या पंतप्रधानांकडून कौतुक 


हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणा-यास अटक


रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हाची निवृत्ती


पुणे : बँक घोटाळा; आमदार अनिल भोसले पोलिस कोठडीत (Video)


रतन लाल यांना मिळणार 'शहिद दर्जा', राज्य सरकारकडून १ कोटींची मदत


'चंद्रपूर'च्या दारूबंदी विरोधात ९३ टक्के निवेदने 


कोल्हापूर : म्हाकवे फाट्यावरील अपघातात केनवडेचा तरूण ठार 


राज्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी विषय सक्तीचा


परभणी : इटाळी खून प्रकरणाचे गूढ वाढले


कोरोना : राज्यातील सर्व ९१ प्रवाशांची चाचणी निगेटिव्ह, आरोग्यमंत्र्यांची माहिती