Wed, Apr 01, 2020 00:32होमपेज › Ankur › लॉस्ट सिटी ऑफ मंकी गॉड

लॉस्ट सिटी ऑफ मंकी गॉड

Last Updated: Jan 11 2020 2:04AM
शेकडो वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिकेत माया, इंका व अ‍ॅझटेक संस्कृतीहून भिन्न अशी एक संस्कृती नांदत होती. आताचा होंडूरास देश जेथे आहे, तेथे या संस्कृतीचे लोक राहत होते. या संस्कृतीचे प्रमुख केंद्र असलेल्या शहराचा शोध नुकताच लागला. ‘लॉस्ट सिटी ऑफ मंकी गॉड’ असे नाव देण्यात आलेले हे शहर गर्द जंगलाखाली गाडले गेले होते. लिडार उपकरणाद्वारे शोध घेतला असता, येथे प्राचीन शहराच्या खाणाखुणा आढळल्या. येथे एका देवतेचे दगडी मस्तकही आढळले. ही वानर देवता या संस्कृतीतील प्रमुख देवता असावी, असा अंदाज आहे. ही संस्कृती इसवी सन 1,000 ते 1,500 या काळात येथे राहत होती. दक्षिण अमेरिकेत गेलेल्या साहसी स्पॅनिश प्रवाशांनी हे शहर संपन्न असल्याचे नमूद केले आहे. 16 व्या शतकात येथल्या लोकांनी शहर सोडून पलायन केले. मानवाचे मांस शरीरात राहून खाणार्‍या एका जीवाणूमुळे विचित्र रोगाची लागण येथल्या लोकांना झाली असावी. वानर देवतेचा शाप समजून त्यांनी या शहराचा त्याग केला, असे संशोधकांचे म्हणणे आहे.