अजब-गजब : शेंगदाण्याच्या आकाराचा तारा

Published On: Aug 17 2019 2:01AM | Last Updated: Aug 17 2019 2:01AM
Responsive image


तारे सामान्यत: ग्रह-उपग्रहांप्रमाणे गोलाकारच असतात. शास्त्रज्ञांनी एक असाही तारा शोधून काढला आहे, जो चक्‍क शेंगदाण्याच्या आकाराचा आहे. युरोपिअन व्हीएलटी टेलिस्कोप या खगोल दुर्बिर्णीने शोधलेला हा तारा ‘एचआर 5171-ए’आपल्या सूर्याच्या 1,300 पट मोठा आहे. 

पृथ्वीपासून 12 हजार प्रकाशवर्षे दूर अंतरावरच्या या तार्‍याजवळ एक जोड तारा आहे जो त्याच्या एवढ्या जवळून फिरतो की, दोन्ही तारे वेगवेगळे न दिसता एकच असल्याचे भासतात. त्यामुळे एखाद्या शेंगदाण्याप्रमाणे हा तारा भासतो. पिवळ्या रंगाच्या विशाल तार्‍यांपैकी एक असलेल्या या तार्‍याचा परीघ सूर्याच्या परिघाहून 1,300 पट जास्त आहे. तसेच आपल्या सूर्याच्या तुलनेत या तार्‍याची दिप्‍ती दहा लाख पट जास्त आहे. 

या विचित्र आकाराच्या तार्‍याचे आयुष्य काही लाख वर्षेच असेल असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.