क्रांतिकारक शोध : कृत्रिम पाऊस

Last Updated: Oct 05 2019 12:16AM
Responsive image


बहुसंख्य शेतकरी शेतीसाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात पण पाऊस वेळेवर पडेलच असे नाही. यामुळे कृत्रिम पावसाच्या शोधाला महत्त्व आले आहे. वास्तविक कृत्रिम पाऊस नैसर्गिक पाऊसच असतो पण तो पडावा यासाठी केले जाणारे उपाय नैसर्गिक नसतात, तर मानवी असतात. 

जेथे कृत्रिम पाऊस पाडायचा असतो तेथे पावसाळी ढग असावे लागतात. या ढगांवर विमानाने कोरडा बर्फ, सिल्व्हर आयोडाईड (चांदीचे एक संयुग) व मिठाची फवारणी केली जाते. यामुळे पावसाळी ढगांची घनता वाढते व पाण्याचे थेंब तयार होण्याची प्रक्रिया जलद होते. 

कृत्रिम पावसाचा प्रयोग दुष्काळग्रस्त भागांना पावसाचे पाणी मिळावे यासाठी केला जातो. लुईस गाथमॅन या शास्त्रज्ञाने प्रथम 1891 साली कृत्रिम पावसाची संकल्पना मांडली. 1946 साली अमेरिकन रसायनतज्ज्ञ व्हिन्सेंट स्कॅफर यांनी सर्वात प्रथम कृत्रिम पाऊस पाडून दाखवला.

रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हाची निवृत्ती


पुणे : बँक घोटाळा; आमदार अनिल भोसले पोलिस कोठडीत (Video)


रतन लाल यांना मिळणार 'शहिद दर्जा', राज्य सरकारकडून १ कोटींची मदत


'चंद्रपूर'च्या दारूबंदी विरोधात ९३ टक्के निवेदने 


कोल्हापूर : म्हाकवे फाट्यावरील अपघातात केनवडेचा तरूण ठार 


राज्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी विषय सक्तीचा


परभणी : इटाळी खून प्रकरणाचे गूढ वाढले


कोरोना : राज्यातील सर्व ९१ प्रवाशांची चाचणी निगेटिव्ह, आरोग्यमंत्र्यांची माहिती


सातारा : बीट मार्शल योजनेचा दुसरा टप्पा कार्यान्वित


डोवालांचा दिल्लीत हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा; पीडितांची घोषणाबाजी