Fri, Jul 19, 2019 00:52होमपेज › Ankur › भारत दर्शन : तारांकित पर्यटन स्थळे

भारत दर्शन : तारांकित पर्यटन स्थळे

Published On: Sep 08 2018 1:35AM | Last Updated: Sep 07 2018 8:00PMभारताच्या पर्यटन मंत्रालयातर्फे एका योजनेतंर्गत 19 आयकॉनिक टुरिस्ट साईटस् म्हणजे तारांकित पर्यटनस्थळांची यादी जाहीर करण्यात आली. भारतातील पर्यटन व्यवसायाला चालना देणे व विदेशी पर्यटकांना आकर्षित करणे हा हेतू या यादीमागे आहे. उत्तर प्रदेशातील ताजमहाल व फतेहपूर सिक्री, महाराष्ट्रातील अजंठा व एल्‍लोरा, दिल्‍लीतील लाल किल्‍ला, कुतूबमिनार, हुमायूनची कबर, गोव्यातील कोलवा समुद्र किनारा, राजस्थानातील अमेर किल्‍ला, गुजरातमधील सोमनाथ मंदिर व ढोलविरा, मध्य प्रदेशातील खजुराहो, कर्नाटकातील हंपी, तामिळनाडूतील महाबलीपुरम्, आसामातील काझीरंगा, केरळातील कुमारकोरम् व बिहारमधील महाबोधी अशी ही 17 पर्यटनस्थळे आहेत.

भारतीय पर्यटन मंत्रालय या स्थानांचे पावित्र्य जपून तेथील मूलभूत सोयीसुविधा उदा. रस्ते, पाणी, वीज, दळणवळण व संपर्क यंत्रणा अधिक मजबूत करणार आहे. पर्यटकांसाठी अधिक सुविधा निर्माण करणार आहे. स्थानिक लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून प्रयत्न करणार आहे तसेच या स्थळांचे ब्रँडिंग व प्रमोशन करणार आहे.