Thu, Nov 14, 2019 07:21होमपेज › Ankur › ज्ञानात भर : सर्वात जुने खेळण्यांचे दुकान

ज्ञानात भर : सर्वात जुने खेळण्यांचे दुकान

Published On: Aug 03 2019 1:14AM | Last Updated: Aug 03 2019 1:14AM
हॅमलेज् हे जगातील सर्वात जुने व सर्वात विशाल असे लहान मुलांच्या खेळण्यांचे दुकान आहे. लंडनमध्ये 1760 साली विल्यम हॅमले याने ‘नोहाज आर्क’ या नावाने हे खेळण्याचे दुकान सुरू केले. पाहता पाहता त्याचा विस्तार एवढा वाढला की सध्या जगभरात 18 देशांत हॅमलेज्ची 167 दुकाने आहेत. लंडनमधील मुख्य दुकान सात मजली असून 54 हजार चौरस फूट क्षेत्रफळाचे आहे. प्रत्येक मजल्यावर वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आहेत. काही दुकानांत मुलांना इनडोअर गेम्सही खेळता येतात.

भारतात मुंबई, चेन्‍नई, अमृतसर, भुवनेश्‍वर व अहमदाबाद येथे हॅमलेज्ची दुकाने आहेत. या जगातील सर्वात जुन्या खेळण्याच्या दुकानाला 620 कोटी रुपयांत खरेदी करण्याच्या तयारीत एक भारतीय कंपनी आहे हे विशेष!