Thu, Aug 22, 2019 15:03होमपेज › Ankur › क्रांतिकारक शोध : डॅश डाएट

क्रांतिकारक शोध : डॅश डाएट

Published On: May 11 2019 2:03AM | Last Updated: May 11 2019 2:03AM
आधुनिक युगात मानव निरोगी व दीर्घायुषी राहावा यासाठी अनेक आहारपद्धती विकसित झालेल्या आहेत. वेगन, किटो, होल थर्टी, मेडिटेरेनिअन अशा विविध आहार पद्धतींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा आहार घेण्याचा सल्‍ला दिला जातो. एका संशोधनानुसार डॅश डाएट ही आहारपद्धत यात सर्वाधिक उत्तम मानली जाते. 

मेडिटेरेनिअन म्हणजे मध्यपूर्वेतील आहार पद्धतीशी साम्य असलेल्या या आहारात हिरव्या भाज्या, कडधान्ये, फळे खाण्यावर भर दिला जातो. कमी मेद असलेले दुग्धजन्य पदार्थ व मासे आणि मांस याचा मर्यादित आहार करण्यास या आहार पद्धतीत परवानगी आहे. साखर, मैदा, मीठ यांचा अतिशय कमी वापर, लोणी व जास्त स्निग्धांश असलेली खाद्यतेले न वापरता ऑलिव्ह तेलाचा वापर, सुक्या मेव्यांचा आहारात समावेश अशी या डॅश डाएट पद्धतीची वैशिष्ट्ये आहेत. 

प्रक्रिया केलेल्या अन्‍नपदार्थांना 

आहारातून पूर्णपणे वगळून केवळ सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या अन्‍नपदार्थांचा आहार ते सुद्धा तळणे, भाजणे वगैरे प्रक्रिया न करता करणे ही डॅश डाएटचे वैशिष्ट्ये आहेत.