Wed, Sep 18, 2019 21:22होमपेज › Ankur › भारतदर्शन : आसाम

भारतदर्शन : आसाम

Published On: Sep 07 2019 2:05AM | Last Updated: Sep 07 2019 2:05AM
‘अ होम’ या प्राचीन नावानेही ओळखले जाणारे आसाम उत्तर पूर्वेकडील सात राज्यांपैकी सर्वात मोठे राज्य आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेले हे राज्य ब्रह्मपुत्रा व बराक नदीच्या खोर्‍यात आहे. आसाम चहा व आसाम रेशमासाठी प्रसिद्ध असलेल्या या राज्यात अश्मकालीन युगातील मानवी वसाहती आढळतात. येथे आढळणारा एकशिंगी गेंडा, जंगली पाणम्हैस हे प्राणी अतिशय दुर्मीळ मानले जातात.

काझीरंगा व मानस ही येथील अभयारण्ये जागतिक वारसा दर्जा मिळवून आहेत. गोहाटी हे आसामचे राजधानीचे शहर जगातील शंभर वेगाने प्रगत होणार्‍या शहरांपैकी एक आहे. पावसाळ्याच्या काळात या राज्यात सर्वाधिक पाऊस पडतो. डोंगर उतारावरील चहाचे मळे हे आसामचे वैशिष्ट्य मानले जाते. येथील चहा जागतिक दर्जाचा मानला जातो.

पर्यटन व चहा उद्योगावर आधारित अर्थव्यवस्था असलेल्या या राज्यातील बिहू हा सण व आसामी लोकनृत्य अतिशय प्रसिद्ध आहे.