अद्भुत प्राणी : ब्लॅक घोस्ट नाईफ फिश

Published On: Aug 17 2019 2:01AM | Last Updated: Aug 16 2019 8:03PM
Responsive image


ब्लॅक घोस्ट नाईफ फिशला तुम्ही पाहिले तर पाण्यात एखादा काळ्या रंगाचा चाकू तरंगतो आहे, असे तुम्हाला वाटेल. हा उष्णकटिबंधीय सागरात आढळणारा मासा असून दक्षिण अमेरिका खंडाभोवतालच्या सागरात आढळतो. सुमारे 20 इंच लांबीचा हा मासा पूर्णपणे काळ्या रंगाचा असतो. त्याच्या शेपटावर व नाकावर दोन सफेद रंगाचे ठिपके असतात. 

या माशाच्या शरीरात सूक्ष्म विद्युत चुंबकीय आवेग निर्माण करण्याची व ग्रहण करण्याची क्षमता असते. यामुळे भक्ष्याला शोधणे त्याला सोपे जाते. दक्षिण अमेरिकन आदिवासी जमातीत अशी समजूत आहे की मृत माणसाचा आत्मा या माशाच्या शरीरात प्रवेश करतो. यामुळे या माशाला ब्लॅक घोस्ट असे नाव पडले आहे. चाकूसारख्या आकारामुळे या माशाला नाईफ फिश असेही म्हटले जाते. हा मासा निशाचर असून शक्यतो रात्रीच शिकारीसाठी बाहेर पडतो.