Wed, Jan 23, 2019 15:44होमपेज › Ankur › बाल वीर : एम. व्ही. विष्णू

बाल वीर : एम. व्ही. विष्णू

Published On: Sep 08 2018 1:35AM | Last Updated: Sep 07 2018 8:03PMकेरळ राज्य ही देवभूमी मानली जाते. केरळ राज्यातील थ्रिसूर येथील 16 वर्षांचा एम. व्ही. विष्णू एका मुलीसाठी देवदूत बनला. आयटीआयमध्ये शिकणारा एम. व्ही. विष्णू नेहमीप्रमाणे थ्रिसूर रेल्वे स्थानकावर आला. रेल्वे स्थानकावर उभा असताना त्याला दिसले की, एक लहान मुलगी रेल्वे रुळ ओलांडत असताना रेल्वे रूळावर पडली. त्या रुळांवरून काही अंतरावर एक वेगवान रेल्वे धडधडत येताना त्याला दिसली. अनेक जण हे काळजाचा थरकाप उडवणारे द‍ृश्य पाहत होते. मात्र कोणीही धावत जाऊन त्या मुलीला वाचवण्याची हिंमत दाखवत नव्हते.

एम. व्ही. विष्णूने मात्र लगेच धावत जाऊन त्या मुलीला रुळावरून दूर केले. वेगवान रेल्वे काही फूट दूरवर अंतरावर असताना विष्णूने दाखविलेल्या धाडसामुळे त्या मुलीचे प्राण वाचले. 2013 सालच्या प्रजासत्ताकदिनी केरळातील तीन मुलांना राष्ट्रपती शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यात एम. व्ही. विष्णूचा समावेश होता.