Sat, Feb 23, 2019 00:59होमपेज › Ahamadnagar › युवकाला लुटणार्‍या सहा महिलांना अटक

युवकाला लुटणार्‍या सहा महिलांना अटक

Published On: Jan 16 2018 2:08AM | Last Updated: Jan 15 2018 10:34PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

माळीवाडा बसस्थानकालगत जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर युवकाला लुटल्याप्रकरणी 6 महिलांना कोतवाली पोलिसानी अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक केलेल्या महिलांमध्ये जिजाबाई पोपट पवार (रा. रेल्वे फाटक), आशा हिरालाल जाधव (रा. रेणुकानगर), कविता अनिल पवार (रा. राधाकृष्ण कॉलनी),  बेबी सुरेश सुपेकर, मीरा मारुती कांबळे, सुमन विश्‍वनाथ त्रिभूवन यांचा समावेश आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, पोलिस निरीक्षक अभय परमार, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी नागवे आदींसह महिला पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, तुषार पांडुरंग आटोळे (वय 18, रा. पांढरेवाडी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) हे त्यांच्या गावी जाण्यासाठी माळीवाडा बसस्थानक येथे थांबले होते. बिस्किट पुडा आणण्यासाठी आटोळे हे बसस्थानकाच्या बाहेर गेले होते. 6 महिलांना त्यांना वेढा घातला. ‘कोठे जायचे आहे’, असे विचारून एका बोळीत नेले व तेथे झटापट करून आटोळे यांच्या खिशातील 1 हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. आटोळे यांनी ही माहिती पोलिसांना देताच तातडीने संबंधित सहा महिलांना पकडले. त्यांच्याविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करून अटकेची कार्यवाही करण्यात आली आहे.