Fri, Feb 22, 2019 02:27



होमपेज › Ahamadnagar › पोलिस ठान्याच्या आवारात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न 

पोलिस ठान्याच्या आवारात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न 

Published On: Sep 03 2018 4:52PM | Last Updated: Sep 03 2018 4:52PM



श्रीगोंदा : प्रतिनिधी 

श्रीगोंदा पोलिस ठाण्यासमोर आज (दि. ३ सप्टेंबर) दुपारी अडीच वाजन्याच्या सुमारास एका महिलेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. नाजुका भोसले असे विष प्राशन करणाऱ्या महिलेचे नाव आहे.  पोलिसांनी या महिलेस उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून, तिच्यावर उपचार सुरु आहेत. 

दरम्यान, या महिलेने आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न करण्याचे कारण अद्याप समोर आले नाही.