Mon, Aug 19, 2019 11:06होमपेज › Ahamadnagar › व्हॉटसअपॅच्या ‘त्या’ मेसेजने एकास जेलवारी!

व्हॉटसअपॅच्या ‘त्या’ मेसेजने एकास जेलवारी!

Published On: Jun 21 2018 1:29AM | Last Updated: Jun 20 2018 11:33PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

अहमदनगर जिल्ह्यात लहान मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवांना उधाण आले आहे. व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर अशा प्रकारचा मेसेज टाकणे श्रीरामपूर येथील एका तरुणाला चांगलेच महागात पडले. व्हॉटसअ‍ॅपवर अफवा पसरविल्याप्रकरणी संजय गवजी भोसले (वय 32, अतिथी कॉलनी, श्रीरामपूर) या तरुणास अटक करण्यात आली आहे. दरम्यान, राहुरीत मुले पळविणारा संशयित म्हणून एका मतिमंद तरुणास मारहाण करण्याची घटना घडली.

श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्हॉटअ‍ॅपवर मेसेज टाकणार्‍या तरुणास रात्री 12 वाजता राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. 
काही नागरिक  व्हॉटअ‍ॅपवर आलेल्या मेसेजची कुठलीही शहानिशा न करता दुसर्‍या ग्रुपमध्ये पाठवितात, हे चुकीचे असल्याचे पोलिस प्रशासन सांगत आहे. गैरसमजातून विनाकारण भिकारी, मनोरुण, रात्रीची काम करणारी माणसे हे नागरिकांच्या रोषाला बळी पडत आहे. 

राहुरीत नागरिकांनी संशयातून तरूणास खोलीत डांबून ठेवले. पोलिसांनी तात्काळ जाऊन त्या तरुणाची सुटका केली. तो मतिमंद असल्याचे समोर आले. यामुळे केवळ संशयावरून कुणाला मारहाण करू नका, तसेच व्हॉटअ‍ॅपवर अफवा पसरवू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.