Sun, Aug 25, 2019 02:22होमपेज › Ahamadnagar › अहमदनगरमध्‍ये पुन्‍हा मतदान केंद्रात गर्दी

अहमदनगरमध्‍ये पुन्‍हा मतदान केंद्रात गर्दी

Published On: Apr 23 2019 2:14PM | Last Updated: Apr 23 2019 4:45PM
अहमदनगर : प्रतिनिधी

अहमदनगरमध्‍ये सकाळपासून मतदारांच्‍या रांगा लागल्‍या आहेत. लोकसभा निवडणुकीचा उत्‍साह मतदारांमध्‍ये दिसत आहे. आज दुपारी १ वाजेपर्यंत ३५ टक्‍के मतदान झाले आहे. रखरखत्‍या उन्‍हातही मतदारांचा उत्‍साह कायम टिकून आहे. 

 नगर अपडेट 

- केडगावमधील अंबिकानगर येथील जिल्‍हा परिषद शाळेत मतदान यंत्र अर्धा तास बंद पडल्‍याने मतदान प्रक्रिया थांबली होती.

दुपारनंतर ठिकठिकाणी पुन्‍हा मतदान केंद्रात गर्दी 

- दुपारपर्यंत ४५ टक्‍क्‍यांहून अधिक मतदान 

नगर  विधानसभा मतदारसंघ निहाय झालेले मतदान  

शेवगाव ३४.५४ टक्‍के 

राहुरी २९.६०  टक्‍के 

पारनेर ३१.४३  टक्‍के

अहमदनगर शहर ३२.१६  टक्‍के 

श्रीगोंदा ३१.२३  टक्‍के 

कर्जत जामखेड  ३३.४०
 

- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथील जालिंदर चोभे नावाच्या व्यक्तीने कुठलीतरी टणक वस्तू मतदान यंत्रावर मारून ईव्हीएम मशीनचा निषेध केला. मतदान केंद्र येथे बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

- नगरसाठी दुपारपर्यंत 34.73 टक्के मतदान

- अनेक ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडल्याने निवडणूक अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली