Wed, May 22, 2019 10:14होमपेज › Ahamadnagar › चांद्यात रोडरोमिओची ग्रामस्थांकडून धुलाई  

चांद्यात रोडरोमिओची ग्रामस्थांकडून धुलाई  

Published On: Jan 18 2018 1:48AM | Last Updated: Jan 17 2018 11:24PM

बुकमार्क करा
चांदा : वार्ताहर

नेवासा तालुक्यातील चांदा येथील विद्यालयातील विद्यार्थिनींची छेडछाड काढणार्‍या रोडरोमिओची चांदा व परिसारातील युवकांनी येथेच्छ धुलाई केली. तसेच त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी विद्यार्थिनींची छेडछाड कारणार्‍यांची गय केली जाणार नाही, असा इशारा छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यावेळी दिला.

चांदा परिसरात शाळेसमोर उभे राहून अनेक टारगट तरुण विद्यार्थिनींची छेड काढतात. हा प्रकार रोजचाच झाल्याने पालक वर्गही संतप्त होता. त्यातच काल एक मुलीची छेड काढल्याचे चांदा व बर्‍हाणपूर येथील पालकांना समजले. त्यांनी ग्रामस्थांना हा प्रकार सांगितल्याने या दोन्ही गावांतील जवळपास एक ते दीड हजार तरुण फरशी पुलावर जमले. यावेळी तेथे छेड काढणार्‍या रोडरोमिओला पकडून त्याची यथेच्छ धुलाई करण्यात आली. त्यानंतर त्याला चांदा ग्रामपंचायत कार्यालयात आणण्यात आले.

तोपर्यंत प्रचंड जमाव बाजारतळ परिसरात जमला होता. याबाबत सोनई पोलिस ठाण्यास माहिती देण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सोनई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किराण शिंदे काही मिनिटांतच आपला फौज फाटा घेऊन गावात दाखल झाले. प्रथम त्यांनी जमावास शांत केले. त्यानंतर सदर युवकास ताब्यात घेतले. तसेच त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.