Wed, Apr 24, 2019 19:32होमपेज › Ahamadnagar › वाळकीतील विहिरीत सापडला मृतदेह

वाळकीतील विहिरीत सापडला मृतदेह

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 19 2018 11:46PMवाळकी :वार्ताहर

नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथील किसन धोंडिबा गायकवाड यांचा मृतदेह वाळकी परिसरातील विहिरीत आढळून आला. गायकवाड यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी ताब्यात घेतला. मात्र याबाबत कुठलीही तक्रार न आल्याने नगर तालुका पोलिस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आली नसल्याची माहिती ठाणे अमंलदारांनी  दिली. वाळकी येथे साकत रस्त्यावरील विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना कळविली. पोलिस कर्मचारी गायकवाड, भोसले व येथील पोलिस पाटील कैलास भालसिंग यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेह पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. मात्र पोलिसांना मृतदेहाचीओळख पटत नव्हती. बाबुर्डी घुमट येथील किसन धोंडिबा गायकवाड (वय 45) हे मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होते. या घटनेची माहिती समजता ते घटनास्थळी आले असता, त्यांनी गायकवाड यांचा मृतदेह ओळखला. मयत व्यक्ती भोळसर असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.  मयत हा रोजच वाळकी येथे येत होता. मात्र तो तीन दिवसांपासून घरी आलाच नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. पोलिसांनी नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. याबाबत कोणतीही तक्रार नातेवाईकांनी पोलिसांकडे दाखल केली नाही. मृतदेह ताब्यात घेवून नातेवाईक तो अंत्यविधी करण्यासाठी बाबुर्डी येथे घेऊन गेले.