Wed, Jun 26, 2019 11:22होमपेज › Ahamadnagar › कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Published On: Feb 12 2018 1:47AM | Last Updated: Feb 11 2018 10:56PMटाकळी ढोकेश्वर : वार्ताहर

नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर भाळवणी नजीक कार व दुचाकीच्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. हा अपघात काल (दि.11) सकाळी झाला. 

याविषयी सविस्तर माहिती अशी की, काल खारेकर्जुने (ता. नगर) येथील दादासाहेब रावसाहेब पळसकर (वय 23) हा तरुण दुचाकीवरून (एमएच-16 डी टी-8015) भाळवणी येथे लग्नाला आला होता. लग्नसमारंभ आटोपून पळसकर  दुपारी दोनच्या सुमारास घरी परतत होता. यावेळी नगर-कल्याण रस्त्यावर भाळवणीजवळील पेट्रोल पंपासमोर त्याच्या दुचाकीला कारची (क्र. एमएच- 16 एटी 5597) पाठीमागून धडक बसली. या धडकेमुळे पळसकर हा समोरून येणार्‍या ट्रकखाली फेकले गेले. त्यात तो जबर जखमी झाला.

जखमीला उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.  अपघातानंतर नॅनो कार दहावा मैल येथे टायर फुटल्याने थांबली, तर ट्रकचालक ट्रक घेऊन फरार झाला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे ट्रकचालकास टाकळी ढोकेश्वर येथे पकडण्यात आले. पुढील तपास पो. हेड. कॉ. अहमद शेख आदी करत आहे.