Thu, Feb 21, 2019 19:41होमपेज › Ahamadnagar › दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी

दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी

Published On: Apr 06 2018 1:30AM | Last Updated: Apr 05 2018 11:32PMश्रीगोंदा : प्रतिनिधी 

तालुक्यातील हिरडगाव चौफुला येथे दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात काल (दि.5) दुपारी तीनच्या सुमारास घडला. 

हिरडगाव व घोडेगावच्या शिवेवर असणार्‍या कुकडी वितरिका क्र. 13 नजीक असलेल्या हॉटेल जय भवानीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. दोन्ही दुचाकीस्वार वेगात असल्याने वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे दोन्ही दुचाक्याची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही दुचाक्यांचा पुढील भाग बाजूला तुटून पडला आहे. या अपघातात कुळधरण (ता. कर्जत) येथील छायाचित्रकार राजेश जगताप (वय 27) हे जागीच ठार झाले. तर राक्षसवाडी येथील गणेश मेहत्रे (वय 24)  हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी  रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

हेल्मेटमुळे वाचले प्राण 

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार कर्जतहून श्रीगोंद्याकडे जात असलेल्या गणेश मेहेत्रे यांच्या डोक्यात हेल्मेट होते. अपघात झाल्यानंतर त्यांच्या डोक्यातील हेल्मेट बाजूला उडून पडले. मात्र त्यांच्या डोक्याला जास्त इजा झाली नाही. 

Tags : nagar, nagar news, two wheeler accident, One killed, one injured,