Tue, Jul 07, 2020 07:42होमपेज › Ahamadnagar › नगर शहरातून दोन टन प्लास्टिक जप्त; महापालिकेची कारवाई

नगर शहरातून दोन टन प्लास्टिक जप्त

Published On: Jul 19 2019 2:55PM | Last Updated: Jul 20 2019 2:07AM
अहमदनगर : प्रतिनिधी

प्लास्टिक बंदी धोरणाअंतर्गत अहमदनगर महापालिकेने आजवरची सर्वात मोठी कारवाई केली आहे. दाळमंडई परिसरात दोन टन प्लास्टिक महापालिकेच्या पथकाने जप्त केले आहे. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

आडते बाजार, दाळमंडई रस्त्यावर दोन छोट्या ट्रकमधून प्लास्टिकची वाहतूक केली जात होती. महापालिकेच्या पथकाने या ट्रकची तपासणी केल्यानंतर त्यात प्लास्टिक आढळून आले. सुमारे दोन ते तीन लाख रुपये किमतीचा दोन टनांपेक्षा अधिक प्लास्टिक जप्त करण्यात आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. 

स्वच्छता निरीक्षक पी. एस. बिडकर, स्वच्छता निरीक्षक अविनाश हंस यांच्यासह मुकादम व सफाई कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.