Wed, Aug 21, 2019 01:55होमपेज › Ahamadnagar › नगर : बेलवंडी-शिरूर रस्‍त्याकडेला आढळले २ मृतदेह

नगर : बेलवंडी-शिरूर रस्‍त्याकडेला आढळले २ मृतदेह

Published On: Apr 10 2018 9:39AM | Last Updated: Apr 10 2018 9:42AMश्रीगोंदा : पुढारी ऑनलाईन

बेलवंडी-शिरूर रस्‍त्यावर असणार्‍या सातववाडी (ढवळगा) येथे रस्‍त्याच्या बाजूला दोघांचे मृतदेह आढळले. आज (दि. १०) रोजी पहाटेच्या सुमारास हा प्रकार पुढे आला. मृत दोघे पारगाव येथील असल्याची माहिती आहे. तर मृतदेहांपासून काही अंतरावर दुचाकी आढळली आहे.

पोलिस सूत्रांनी हा अपघात असल्याची माहिती दिली आहे. तरी सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत. चौकशीत दोघे पारगाव येथील असल्याच समोर आले आहे. अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. 

Tags : nagar, nagar news, ahemadnagar,