Fri, Nov 16, 2018 02:56होमपेज › Ahamadnagar › शिवसैनिकांनी हिवरगाव पावसा टोलनाका फोडला

शिवसैनिकांनी हिवरगाव पावसा टोलनाका फोडला

Published On: Apr 23 2018 2:33PM | Last Updated: Apr 23 2018 2:33PMसंगमनेर :प्रतिनिधी

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा येथील टोलनाका शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे तसेच उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यासह शिवसैनिकांनी सोमवारी फोडला.

संगमनेर शहर व तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसह शिवसैनिकांनी सोमवारी सकाळी  हिवरगाव पावसा येथील खेड-सिन्नर एक्प्रेस वे लिमिटेड कंपनीच्या टोलनाक्यावर आले. एम. एच. १७ पासिंग असलेल्या सर्व चारचाकी वाहनांना टोलमुक्त करावे, अशी मागणी करीत शिवसैनिकांनी टोल नाक्यावर आंदोलन केले. त्यानंतर शिवसैनिकांनी टोलनाक्याची तोडफोड सुरु केली. तसेच टोल व्यवस्थापनाकडून लावलेले बॅरेकेटस् तोडले व सर्व वाहनांसाठी रस्ता खुला केला. पोलिसांसमोरच शिवसैनिकांची ही टोलफोड सुरु होती. मात्र, पोलिसांनी कोणालाही मज्जाव केला नाही. शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, संगमनेर तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, शहर प्रमुख अमर कतारी, अप्पासाहेब केसेकर, सोमनाथ कानकाटे, अशोक सातपुते आदी यावेळी उपस्थित होते.