Sat, Jul 04, 2020 15:11होमपेज › Ahamadnagar › बारामतीच्या 'त्या' कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात श्रीगोंदेतील तिघे जण 

बारामतीच्या 'त्या' कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात श्रीगोंदेतील तिघे जण 

Last Updated: Mar 30 2020 11:57AM
श्रीगोंदे (अहमदनगर) : पुढारी वृत्तसेवा 

बारामतीच्या 'त्या' कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात श्रीगोंदा तालुक्यातील तीन व्यक्ती आले असल्याची माहिती समोर आली असून या तिघांना तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या यंत्रणेकडून सांगण्यात आले. नगर आणि जामखेड येथील प्रत्येकी दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे.

बारामती येथील एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे समोर आले. या व्यक्तीच्या संपर्कात श्रीगोंदे तालुक्यातील तिघे व्यक्ती आल्याचे समोर आले आहे. २० मार्च रोजी या तीनही व्यक्ती शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी 'या' कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. 

वाचा - नाशिकच्‍या 'त्‍या' शेतकर्‍याचे व्‍हीव्‍हीएस लक्ष्‍मणकडून कौतुक!

बारामती येथील व्यक्तीच्या संपर्कात आलेले  तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह आहेत की नाहीत, यासाठी त्यांची तपासणी करण्यासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले जात आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर म्हणाले, त्या व्यक्तीच्या हे तिघे संपर्कात आल्याची माहिती मिळाली आहे. या तिघांच्या तपासण्या करण्यासाठी नगर येथे पाठविण्यात येणार आहे. वाढता धोका लक्षात घेऊन कुणीही घराबाहेर पडू नये. सर्वांसमोर असलेले हे मोठे संकट असtन सगळ्यानी मिळून याचा मुकाबला करावयाचा आहे. 

वाचा - कोल्हापूर ब्रेकिंग : सीपीआर कोरोना कक्षातील संशयित ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

आता तरी बेफिकीरपणा सोडा 

आपल्या ग्रामीण भागात कोरोना येऊ शकत नाही, अशा अविर्भावात काही मंडळी लॉकडाऊन असतानाही बेफिकिरपणे रस्त्यावरून फिरत आहेत. प्रशासन वारंवार सांगूनही लोकांच्या मानसिकतेत फरक पडत नाही. आता हे संकट श्रीगोंदे तालुक्याच्या उंबरठयावर येऊन ठेपले आहे. आता तरी बेफिकीरपणा सोडा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.