Fri, Apr 26, 2019 03:38होमपेज › Ahamadnagar › ‘छिंदमचा पाठीराखा शोधण्याची हिच वेळ’

‘छिंदमचा पाठीराखा शोधण्याची हिच वेळ’

Published On: Feb 27 2018 2:05AM | Last Updated: Feb 26 2018 10:41PMश्रीगोंदा : प्रतिनिधी

नगर  महानगरपालिकेचा माजी उपमहापौर श्रीपाद  छिंदम शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्याचे पडसाद राज्यभरात उमटले. भाजप वगळता सर्व पक्ष व शिवप्रेमी संघटनांनी छिंदमचा निषेध केला. त्यामुळे त्याला माफी मागावी लागली. पदाचा राजीनामा द्यावा लागला. तसेच त्यास अटकही करण्यात आली. या सर्व घडामोडींमध्ये छिंदमला कोण कोण पाठीशी घालीत आहे ? याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी प्रा. तुकाराम दरेकर यांनी व्यक्त केली आहे.

प्रा. दरेकर म्हणाले, छिंदमचा उपमहापौरपदाचा राजीनामा तातडीने महापौरांकडे मंजुरीला गेला नाही. त्यांच्यावर कलम 295 अ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. सदरचे कलम दखलपात्र, अजामीनपात्र व नॉन कंम्पाऊंडेबल असताना छिंदमला पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी न करता न्यायालयीन कोठडी का मागितली? पोलिसांवर नेमके कोणाचे दडपण होते? याचाही शोध लागला पाहिजे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 13 (1) (अ) प्रमाणे  सदस्य म्हणून कर्तव्य बजावत असताना गैरवर्तणुकीबद्दल तो दोषी ठरला असेल, तर राज्य शासन  स्वत:हून  किंवा महानगरपालिकेच्या शिफारशीवरून त्या सदस्यास पदावरून दूर करता येते. त्यासाठी तीन चतुर्थांश सदस्यांनी मंजूर केलेला ठराव राज्य शासनाकडे पाठविणे गरजेचे आहे. 68 सदस्यांच्या महापालिकेत 51 सदस्यांनी छिंदमला सदस्यपदावरून दूर करण्याचा ठराव करावा लागेल. त्यामुळे असा ठराव करण्यात यावा,