Thu, Feb 21, 2019 09:59होमपेज › Ahamadnagar › ...तर मराठा आरक्षणासाठी दंडुके मोर्चा 

...तर मराठा आरक्षणासाठी दंडुके मोर्चा 

Published On: Apr 21 2018 12:58AM | Last Updated: Apr 20 2018 11:31PMवांबोरी : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत तीनवेळा बैठक झाली. मात्र, तोडगा निघाला नाही. 288 आमदारांपैकी 146 आमदार मराठा समाजाचे असून तेही आता मुके झालेले दिसत आहेत. सरकार मराठा समाजाचे प्रश्‍न सोडविण्याऐवजी वेळ काढूपणा करीत असेल तर मराठा समाजाला आता दंडुके मोर्चा काढावा लागेल, असा इशारा अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे संस्थापक विजय सिंहराजे महाडिक यांनी दिला. अखिल भारतीय मराठा सेवा संघ आयोजित वांबोरी येथील मराठा आरक्षण व शेतकरी मेळाव्याच्या प्रसंगी महाडिक बोलत होते.  यावेळी माजी खा. प्रसाद तनपुरे आणि डॉ. कृषिराज टकले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जि. प. माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, शिवसेनेचे बाळासाहेब पवार, चैतन्य समुहाचे गणेशराव भांड, साईआदर्शचे शिवाजी कपाळे, गणेश खेवरे, सुनिल मोरे, अविनाश खापे, सुनील नागणे आदी उपस्थित होते.

Tags : Ahmadnagar,  Danduke, Front, Maratha Reservation