Thu, Apr 25, 2019 07:41होमपेज › Ahamadnagar › ...तर अधिकार्‍यांना निलंबित करू

...तर अधिकार्‍यांना निलंबित करू

Published On: Apr 21 2018 12:58AM | Last Updated: Apr 20 2018 11:36PMकर्जत : प्रतिनिधी

कुकडीच्या उन्हाळी आर्वतनाचा निर्णय 24 एप्रिलच्या बैठकीमध्ये घेण्यात येईल. मात्र आवर्तन सुटल्यावर कमी दाबाने पाणी आल्यास संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात येईत, असा इशारा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आढावा बैठकीत दिला.कर्जत पंचायत समितीच्या सभागृहात काल खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक ना. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, जिल्हा कृषी अधीक्षक पंडितराव लोणारे, रोहोयोचे अधिकारी वामनराव कदम, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, सभापती पुष्पाताई शेळके, उपसभापती प्रकाश शिंदे, सरपंच काकासाहेब धांडे, विजय तोरडमल, युवराज शेळके, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर आदींसह विविध विभागांचे अधिकारी व सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

यावेळी कुकडी आवर्तन केवहा सुटनार, याकडे तालुक्यातील शेतकर्‍यांचे लक्ष लागले होते, कृषी विभागाचा आढावा संपताच या संदर्भात उपआभियंता विलास पाटील यांनी कुकडीच्या उन्हाळी आवर्तनाची नियोजनाची बैठक 24 एप्रिल रोजी होणार, असे सांगितले. त्यावर काकासाहेब धांडे म्हणाले, पालकमंत्री प्रयत्न करून कुकडीचे पाणी आणतात. मात्र अधिकारी योग्य नियोजन करीत नाहीत. त्यामुळे तालुक्यातील अनेक चार्‍यांना पाणी मिळत नाही. बदनामी मात्र पालकमंत्र्यांची होते. मच्छिंद्र अनारसे यांनी आंबीजळगाव गावाच्या चारी क्रमांक 96 ला मागील 7 वर्षा पासून पाणी सुटलेले नाही व विचारणा केली, तर अधिकारी पाणी देण्यास कर्मचारी नसल्याचे सांगतात.

हाच धागा पकडून ना. शिंदे यांनी उपस्थित कुकडीच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले. आवर्तन वेळेवर सुटते, धरणामधून कालव्याच्या क्षमतेनुसार पाणी सोडण्यात येते. मग पाण्याचा गेज पडतो. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी कुकडीच्या अधिकार्‍यांची बैठक घ्यावी. यापुढे जर गेज पडले, तर त्या संबंधित चारीचे कर्मचारी आणि अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच जे शेतकरी कालवा किंवा गेटमधून पाणी घेतील, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा, असे ना. शिंदे यावेळी म्हणाले. यावेळी टंचाई अराखडाचे नियोजन काटकोर करावे असे सांगून त्यांनी भूजलचे व जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी आभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. रजपुतवाडी पाणी योजना पूर्ण करावी, अशा सूचना केल्या.यावेळी मिरजगावचे सरपंच नितीन खेतमाळीस यांनी डुकरी नदीच्या जलयुक्तच्या अपूर्ण कामासाठी जेसीबी देण्याची मागणी केली..

Tags : Ahmadnagar,  suspend,  authorities