होमपेज › Ahamadnagar › भरदिवसा चार लाखांची चोरी

भरदिवसा चार लाखांची चोरी

Published On: Dec 07 2017 1:34AM | Last Updated: Dec 07 2017 12:35AM

बुकमार्क करा

टाकळीभान : वार्ताहर

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे सायंकाळी 5.45 वाजेच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारची मागील काच फोडून मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी कारमध्ये ठेवलेले 4 लाख रुपये घेऊन पोबारा केला.

टाकळीभान येथील दूध संकलन केंद्राचे पांडुरंग सावळेराव कोकणे यांनी श्रीरामपूर येथील स्टेट बँकेतून 4 लाख रुपयांची रक्कम काढली. कार (क्रमांक एम.एच. 17, ए.ए. 0082) मधून ते टाकळीभान येथे येत होते. टाकळीभान येथील खंडागळे वस्तीजवळ आल्यावर त्यांनी आपली कार रस्त्याच्या कडेला लावली व रोडच्या पलीकडे एका दुकानात गेले.

मोटारसायकलवरून आलेल्या दोन मोटारसायकलवरील अज्ञात चार जणांनी कारची मागील काच हेल्मेटने फोडली व कारमधील 4 लाख रुपये रक्कम घेऊन पोबारा केला. काम आटोपून कोकणे गाडीकडे आले असता, गाडीची मागील काच फोडलेली दिसली व गाडीतील रक्कम चोरी झाल्याचे दिसून आले. टाकळीभान पोलिस ठाण्यापासून जवळच खंडागळे वस्ती आहे. या ठिकाणी श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर दिवसा ही चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.